RCB vs LSG IPL 2024 royal challengers bangalore vs lucknow super giants live match 1st inning live score twitter
Sports

RCB vs LSG, LIVE: डीकॉकची वादळी सुरुवात अन् पुरनचा फिनिशिंग टच! लखनऊचे RCB समोर विजयासाठी १८२ धावांचे आव्हान

RCB vs LSG, Live Match: आयपीएल २०२४ स्पर्धेतील १५ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपर जांयट्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे.

Ankush Dhavre

RCB vs LSG, LIVE Score:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील १५ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपर जांयट्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामीच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकला आणि पाहुण्या लखनऊ सुपर जायंट्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपरजायंट्स संघाने २० षटकअखेर ५ गडी बाद १८१ धावा केल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला हा सामना जिंकण्यासाठी १८२ धावांची गरज आहे.

चिन्नास्वामीवर डीकॉक, पूरनचं वादळ...

या सामन्यात नाणेफेक गमावून फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लखनऊ सुपरजायंट्स संघाला केएल राहुल आणि क्विंटन डीकॉकने चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी मिळून ५३ धावा जोडल्या. त्यानंतर केएल राहुल २० धावा करत माघारी परतला. मात्र डीकॉकने आपला हल्ला सुरुच ठेवला.

या डावात क्विंटन डीकॉकने ५६ चेंडूचा सामना करत ८ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ८१ धावांची तुफानी खेळी केली . त्यानंतर मार्कस स्टोइनिसने २४ धावांचे बहुमुल्य योगदान दिले. शेवटी निकोसल पुरनचा शो पाहायला मिळाला. त्याने या डावात २१ चेंडूंचा सामना करत ताबडतोड ४० धावांची खेळी केली. एकवेळ असं वाटलं होतं की, लखनऊचा संघ या डावात १५० धावांपर्यंत मजल मारणार. मात्र शेवटच्या २ षटकांमध्ये पुरनने बंगळुरुच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. २० षटकअखेर लखनऊने ५ गडी बाद १८१ धावा केल्या. (Cricket news in marathi)

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११ :

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु: विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), कॅमरन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत (यष्टीरक्षक), रिस टॉपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.

लखनऊ सुपर जाएंट्स: क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, क्रुणाल पांड्या, रवि बिश्नोई, यश ठाकुर, नवीन उल हक, मयंक यादव.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT