virat kohli funny video twitter
Sports

Virat - Zaheer Khan Video: 'विराट रॉक्स जहीर शॉक',मस्तीखोर विराटने जहीरला पाहताच पोटावर फिरवला हात; पुढे जे झालं ते एकदा पाहाच

Virat Kohli- Zaheer Khan Funny Video: विराट कोहलीचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

IPL 2023 Funny Videos: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ३६ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या रोमांचक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघातील खेळाडूंनी जोरदार कामगिरी करत २१ धावांनी विजय मिळवला.

या विजयासह कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपली पराभवाची मालिका थांबवली. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने जोरदार अर्धशतक झळकावले. मात्र तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. दरम्यान या सामन्यानंतर विराट कोहलीचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

विराट कोहली हा क्रिकेटच्या मैदानावर जितका आक्रमक असतो, मैदानाच्या बाहेर तितकाच मस्ती देखील करत असतो. एका व्हिडिओमध्ये तो माजी भारतीय क्रिकेटपटू जहीर खानसोबत मस्ती करताना दिसून आला आहे. भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू जहीर खान सध्या समालोचकाची भूमिका पार पाडतोय.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या सामान्यादरम्यान विराट कोहली आणि जहीर खान यांची भेट झाली होती. त्यावेळी विराट कोहली जहीर खानच्या पोटाची खिल्ली उडवताना दिसून आला होता. पोटावर थाप मारली.

विराटने केलेली ही मस्करी पाहून जहीरलाही हसायचा मोह आवरला नाही. त्यावेळी रॉबिन उथप्पाही तिथे उपस्थित होता. (Latest sports updates)

फिटनेसवर अधिक भर देतो विराट

काही वर्षांपूर्वी भारतीय संघात फिटनेसला इतकं महत्व दिलं जात नव्हतं. मात्र विराटने भारतीय संघाची जबाबदारी स्वीकारताच भारतीय संघात एक मोठा बदल पाहायला मिळाला. भारतीय संघाचा क्षेत्ररक्षणाचा स्तर उंचावला आहे. खेळाडू आता मैदानासह जिममध्ये देखील मेहनत घेताना दिसून येत आहेत. फिटनेसचा स्तर उंचावल्याने दुखापतीचं प्रमाण कमी झालं आहे.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने २०० धावांचा डोंगर उभारला होता. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून जेसन रॉयने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली.

तर नितीश राणाने ४८ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ५४ धावांची खेळी केली. तर महिपाल लोमरोरने ३४ धावांचे योगदान दिले. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ विजयापासून २१ धावा दूर राहिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Issues: पत्नी असूनही पुरुष परक्या स्त्रीच्या प्रेमात का पडतात? वाचा पुरुषांच्या मनातील रहस्य

Maharashtra Live News Update: महाडमध्ये मनसे पधिकाऱ्याला मारहाण

Mumbai To Kedarnath Travel: मुंबईहून केदारनाथ यात्रेचा प्रवास कसा कराल? प्रवास मार्ग, ट्रॅव्हल टिप्स जाणून घ्या

King First Look: 'डर नहीं, दहशत हूं...'; शाहरुखकडून चाहत्यांना खास भेट,'किंग'चा पहिला लूक प्रदर्शित

Mexico Supermarket : सुपरमार्केटमध्ये अग्नितांडव! लहान मुलांसह २३ जणांचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT