Ravindra Jadeja Ball Tampering Saam tv
Sports

Ravindra Jadeja Ball Tampering:विजय मिळवळल्यानंतर टीम इंडियाला मोठा धक्का ! ICC ने जडेजावर केली 'ही' कडक कारवाई

या सामन्याचा हिरो ठरलेल्या रवींद्र जडेजाला आयसीसीने मोठा धक्का दिला आहे.

Saam TV News

Ravindra Jadeja Ball Tampering:नुकताच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत ऑस्ट्रेलिया संघावर १ डाव आणि १३२ धावांनी जोरदार विजय मिळवला आहे.

यासह मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. दरम्यान या सामन्याचा हिरो ठरलेल्या रवींद्र जडेजाला आयसीसीने मोठा धक्का दिला आहे. तर भारतीय संघाला सामना जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या रवींद्र जडेजावर आयसीसीने कडक कारवाई केली आहे. त्याने आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल १ चे उल्लंघन केले आहे.

त्यामुळे आयसीसीने त्याच्यावर २५ टक्के मॅच फीस इतका दंड ठोठावला आहे. जडेजाने खेळाडू आणि खेळाडू सपोर्ट कर्मचार्‍यांसाठीच्या आयसीसी आचारसंहितेच्या अनुच्छेद २. २० चे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे.

या कारणामुळे आयसीसीने केली कारवाई..

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी रवींद्र जडेजाने अप्रतिम कामगिरी करत ५ गडी बाद केले होते. या दिवशी तो आणखी एका कारणामुळे चर्चेत आला होता.

यादरम्यान ४६ वे षटक टाकण्यासाठी येत असलेल्या जडेजाने आपल्या बोटाला क्रीम लावल्याचे दिसून आले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्याने हे कृत्य अंपायरची अनुमती न घेता केले होते. त्यामुळे आयसीसीने हे पाऊल उचलले आहे.

जडेजाने मान्य केली आपली चूक..

आयसीसीने हा आरोप केल्यानंतर जडेजाने आपली चूक मान्य केली आहे. बोर्डच्या सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र जडेजाने आपल्या बोटाचे दुखणे कमी करण्यासाठी बोटाला क्रीम लावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart blockage symptoms: हृदयाच्या नसा ब्लॉक होण्यापूर्वी ही लक्षणं ओळखा; हार्ट अटॅक टाळण्यासाठी वेळेत घ्या काळजी

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र धर्म वाढवूया,मराठीची गुढी उंच उभी करुया- देवेंद्र फडणवीसांकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

Gudi Padwa 2026: गुढीपाडव्याला करा गोडाचा बेत! १० मिनिटांत बनवा तांदळाची खीर, सोपी रेसिपी वाचा

Sangli : नामांकित शिक्षण संस्थेच्या संचालकाची निर्घृण हत्या; अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये मृतदेह सापडला, सांगलीतील धक्कादायक घटना

US Iran conflict : अमेरिकेनं इराणवर डागला बंकर बॉम्ब, इराणनं प्रतिहल्ला केल्यास काय होणार?

SCROLL FOR NEXT