Arjun Tendulkar And Sachin Tendulkar: भारतीय संघातील दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने मुंबई इंडियन्स संघासाठी पदार्पण केले आहे. तब्बल 2 वर्षे वाट पाहिल्यानंतर त्याला मुंबई इंडियन्स संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.
पहिल्या सामन्यात त्याला विकेट मिळवता आली नाही. मात्र दुसऱ्या सामन्यात त्याने विकेटच्या कॉलममध्ये भर घातली. दरम्यान या कामगिरीनंतर माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक रवी शास्त्री यांनी त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.
हा सामना झाल्यानंतर रवी शास्त्री यांनी अर्जुन तेंडुलकर सोबत झालेल्या चर्चा सत्रात म्हटले की, 'अर्जुन तू आपल्या वाडिलांपेक्षाही मोठं काम केलं आहे. त्यांनी आपल्या आयपीएल कारकिर्दीत एकही विकेट घेतली नव्हती. मात्र तू आज एक विकेट घेतला आहेस.'
रवी शास्त्रींनी कौतुक करताच अर्जुन तेंडुलकरने आभार मानले आणि आपल्या रणनीतीबाबत खुलासा केला. त्याने म्हटले की, 'मी सरळ आणि ठरलेल्या योजनेनुसार गोलंदाजी केली.' अर्जुन तेंडुलकर या डावात शेवटचे षटक टाकण्यासाठी आला होता. त्यावेळी हैदराबाद संघाला विजय मिळवण्यासाठी 20 धावांची गरज होती. मात्र अर्जुनने केवळ 5 धावा खर्च करत 1 गडी बाद केला होता. (Latest sports updates)
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी बाद 192 धावा केल्या होत्या. कॅमेरून ग्रीनने 40 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांचा मदतीने नाबाद 64 धावांची खेळी केली होती.
या धावांचा पाठलाग करताना हैदराबाद संघाने एकपाठोपाठ एक विकेट्स गमावल्या होत्या. मयांक अगरवालने 48 तर क्लासेनने 36 धावांची खेळी केली. मात्र तो आपल्या संघाला सामना जिंकवून देऊ शकला नाही. मुंबई इंडियन्स संघाने 14 धावांनी विजय मिळवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.