...म्हणून राशिद खानने सोडला हैद्राबादचा संघ; ट्विट करत दिली माहिती
...म्हणून राशिद खानने सोडला हैद्राबादचा संघ; ट्विट करत दिली माहिती Twitter/@ANI
क्रीडा | IPL

...म्हणून राशिद खानने सोडला हैद्राबादचा संघ; ट्विट करत दिली माहिती

वृत्तसंस्था

आयपीएल 2022 (IPL 2022) च्या मेगा लिलावापूर्वी सध्याच्या आठ संघांनी आपल्या खेळाडूंना रिटेन केले आहे. अनेक संघांनी आपल्या बड्या खेळाडूंना कायम ठेवलेले नाही, तर अनेकांनी स्वतःहून आपल्या संघापासून फारकत घेतली आहे. ज्यांनी स्वत:च्या मनाने आपला संघ सोडण्याचा निर्णय घेतला त्यात राशीद खान (Rashid Khan) हे एक मोठे नाव आहे, त्याने सनरायझर्स हैदराबादसाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. राशिद खानचे फ्रेंचायझीमधून बाहेर पडण्याचे कारण काय आहे?

राशिद खान सुरुवातीपासूनच आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळत आला आहे. राशिद खानला हैदराबाद संघाने 2017 मध्ये 4 कोटी रुपयांना खरेदी केले होते. या लीगमध्ये खेळताना त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आणि या स्पर्धेतील सर्वाधिक महाग विकला जाणारा अफगाणिस्तानचा खेळाडू ठरला. 2018 मध्ये सनरायझर्स हैदराबादने त्याची रक्कम 4 कोटींवरून 9 कोटी केली आहे.

राशिद खानने आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून पाच हंगामात एकूण 76 सामने खेळले. या फ्रँचायझीसाठी त्याने स्पर्धेत एकूण 93 बळी घेतले. आता तो हैदराबाद संघापासून वेगळा झाला आहे, मात्र चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की राशिद खानने संघ सोडण्याचा निर्णय का घेतला? सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राशिदने संघ सोडण्याचे कारण स्पर्धेत मिळालेली रक्कम नाही तर उलट कारण काहीतरी वेगळे आहे.

तो केवळ पैशासाठी क्रिकेट खेळत नाही तर तो ज्या संघासाठी खेळतो त्याचे सामने त्याला जिंकायचे आहेत. राशिद खान पैशांमुळे संघ सोडत नसून त्याला नव्या संघात सामील व्हायचे आहे. नवीन वातावरण, नवीन रणनीती, नवीन आव्हान हवे आहे जेणेकरुन तो स्वत: ला प्रेरित ठेवू शकेल.

राशिद खानने लिहिले - सनरायझर्स हैदराबादसोबतचा प्रवास चांगला होता. आपल्या सहकार्याबद्दल आपले आभार. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद आणि प्रेम. त्याने संघ आणि चाहत्यांचे आभार मानले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

SCROLL FOR NEXT