indian cricket team twitter
Sports

IND vs AFG, Super 8: सुपर 8 साठी अफगाणिस्तानने कंबर कसली! सामन्याआधीच राशिद खानची टीम इंडियाला वॉर्निंग

Rashid Khan On IND vs AFG Super 8 Match: भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये सुपर ८ फेरीतील पहिला सामना रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी राशिद खानने भारतीय संघाला वॉर्निंग दिली आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील सामन्यांना प्रारंभ झाला आहे. भारतीय संघाने साखळी फेरीत एकही सामना न गमावता सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. सुपर ८ फेरीत भारतीय संघाचा पहिला सामना २० जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. हा सामना बारबाडोसच्या मैदानावर होणार आहे. भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करतोय. तर अफगाणिस्तानची कमान jराशिद खानच्या हाती आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी राशिद खानने भारतीय संघाला वॉर्निंग दिली आहे.

साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानला वेस्टइंडिजकडून एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान या पराभवानंतर तो म्हणाला की, ' त्यांनी पावरप्लेच्या षटकात ९० धावा चोपल्या. इथून कमबॅक करणं जरा कठीण आहे. मात्र तरीदेखील आम्ही मधल्या षटकांमध्ये चांगला खेळ केला. हा खेळ रणनीतीचा आहे आणि आम्ही अपेक्षेनुसार खेळ करू शकलो नाही. आम्ही आमच्या पराभवातून शिकवण घेतली आहे.' यादरम्यान राशिद खानने नुर अहमदचं कौतुकही केलं.

तसेच भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्याबाबत बोलताना तो म्हणाला की, ' आम्ही भारतीय संघाला आव्हान देण्यासाठी कंबर कसली आहे. वेस्टइंडिजविरुद्ध झालेल्या पराभवातून आम्हाला आमच्या चुका कळाल्या आणि खूप काही शिकायला देखील मिळालं आहे. या पराभवातून शिकवण घेऊन आम्ही सुपर ८ मध्ये चांगली कामगिरी करू.आता हरलो हे बरंच झालं कारण हा पराभव जर नॉक आऊट सामन्यांमध्ये झाला असता तर त्याचा परिणाम होऊ शकला असता.'

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल

राखीव खेळाडू..

शुभमन गिल, रिंकू सि्ंग, खलील अहमद, आवेश खान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT