ajinkya rahane twitter
Sports

Ajinkya Rahane: लाईव्ह सामन्यात हाय व्हॉल्टेज ड्रामा! आऊट होऊनही रहाणे परत फलंदाजीला आला- VIDEO

Mumbai vs Jammu- Kashmir, Ajinkya Rahane: मुंबईतील बीकेसीच्या मैदानावर मुंबई आणि जम्मू काश्मीर यांच्यातील रणजी ट्रॉफीतील सामना पार पडला.

Ankush Dhavre

रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना सुरुवात झाली आहे. मुंबई आणि जम्मू काश्मीर यांच्यातील सामना मुंबईतील बीकेसीमध्ये सुरू आहे. मुंबईच्या होम ग्राऊंडवर सुरू असलेल्या या सामन्यात जम्मू काश्मीरच्या खेळाडूंनी तगडं आव्हान दिलं.

दरम्यान सामना सुरू असताना शुक्रवारी अशी काही घटना घडली, त्यामुळे अंपायरच्या निर्णयावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

बाद झाल्यानंतर रहाणेला परत बोलवलं..

तर झाले असे की, मुंबई विरुद्ध जम्मू काश्मीर यांच्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असताना अजिंक्य रहाणे बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये जात होता. तेव्हा अंपायरने त्याला परत बोलवलं. हा निर्णय तिसऱ्या अंपायरने घेतला. अंपायरच्या हा नो बॉल असल्याचं सांगितलं.

तर झाले असे की, मुंबईची फलंदाजी सुरू होती. त्यावेळी २५ वे षटक सुरू होते. मुंबईकडून अजिंक्य रहाणे स्ट्राईकवर होता. तर जम्मू आणि काश्मीरकडून नजीर गोलंदाजी करत होता. तो गोलंदाजी करत असताना एक शॉर्ट चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टिरक्षकाच्या हातात गेला.

अंपायरने क्षणाचाही विलंब न करता त्याला बाद घोषित केलं आणि रहाणे पॅव्हेलियनच्या दिशेने निघाला. पुढील फलंदाज शार्दुल ठाकूर फलंदाजीसाठी मैदानात आला.

रहाणे मैदानाबाहेर जातच होता इतक्यात अंपायरने त्याला थांबवलं. तिसऱ्या अंपायरने चेक केले तेव्हा नो बॉल असल्याचं दिसून आलं. त्यानंतर रहाणेला परत आत बोलावलं आणि शार्दुल ठाकूरला बाहेर जायला सांगितलं. रहाणे पॅव्हेलियनपर्यंत पोहोचलाच होता. अंपायरने त्याला इशाराही केला होता. मात्र प्रेक्षकांचा आवाज असल्याने त्याला आवाज ऐकू गेला नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Census 2026 : स्व-गणना पूर्ण करणारं कोकणातलं हे गाव पहिलं ठरलं

ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झालंय? वेळीच करा रिन्यूअल,नाहीतर येईल डोक्याला हात लावण्याची वेळ; जाणून घ्या प्रोसेस

पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार, महागाईचा भडका उडणार? PM मोदींच्या विधानामागे काय आहेत आर्थिक कारणे?

SSC Success Story: दररोज 2 किमीची पायपीट,कंदिलाच्या उजेडात अभ्यास; दहावीत 94.20% गुण मिळवणाऱ्या वैष्णवी बाडगुडेची प्रेरणादायी कहाणी

Palghar Tourism : पालघरमध्ये लपलेले समुद्री सौंदर्य, 'या' बीचवर एन्जॉय करा वीकेंड, कडक उन्हात अनुभवाल थंडगार हवा

SCROLL FOR NEXT