rajat patidar In Team India saam tv news
Sports

Rajat Patidar Debut: 'गुरु' कोहलीच्या जागी खेळणार 'एकलव्य'! रजत पाटीदारची टीम इंडियात एन्ट्री

Rajat Patidar News : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रजत पाटीदारला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. दरम्यान त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Rajat Patidar Debut News:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टनमच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात रजत पाटीदारला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. पदार्पण करण्यापूर्वी त्याने एका व्हिडिओमध्ये विराट कोहलीबाबत मोठे खुलासे केले आहेत.

रजत पाटीदारला विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. मात्र केएल राहुल संघात असल्याने त्याला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आता केएल राहुल संघाबाहेर झाल्यानंतर अखेर त्याचं भारतीय संघात पदार्पण करण्याचं दार उघडलं आहे. रजत आयपीएल स्पर्धेत RCB संघाचं प्रतिनिधित्व करतो. त्याला विराट कोहलीच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे.

विराटबाबत बोलताना काय म्हणाला रजत पाटीदार?

नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तो विराटबाबत भाष्य करत आहे. तो म्हणाला की, 'मी नेट्समध्ये नेहमीच विराटला फलंदाजी करताना पाहतो. तो पुढचे चेंडू उत्तमरित्या खेळून काढतो. मी भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक आहे.' (Cricket news in marathi)

संघातील प्रमुख खेळाडू बाहेर...

भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. केएल राहुल आणि रविंद्र जडेजा हे दोघेही दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाले आहेत. हे दोघे बाहेर झाल्यानंतर सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमारला संधी दिली गेली होती. असं म्हटलं जात होतं की, केएल राहुलच्या जागी सरफराज खानला पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते. मात्र या सामन्यासाठी रजत पाटीदारला संधी देण्यात आली आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस, भरत (यष्टीरक्षक),आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आमच्या भाषणापेक्षा एकत्र दिसणं महत्वाचं आहे - उद्धव ठाकरे

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! हाच तो क्षण, ज्याची लाखो कार्यकर्ते वाट पाहत होती, पाहा व्हिडिओ

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT