Rajasthan Royals vs Punjab Kings x IPL
Sports

RR vs PBKS: राजस्थान संघाची संथ फलंदाजी; पंजाबसमोर १४५ धावांचे आव्हान

Rajasthan Royals vs Punjab Kings : आयपीएलचा ६५ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्जमध्ये होत आहे. हा सामना गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जातोय.

Bharat Jadhav

आयपीएलचा ६५ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्जमध्ये होत आहे. हा सामना गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जातोय. या मोसमातील या मैदानावरील हा पहिलाच सामना आहे. संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या संघाच्या गोलंदाजांनी राजस्थानच्या फलंदाजांवर दबाव ठेवत त्यांना रोखवून ठेवलं. राजस्थान संघाने संथ गतीने खेळ करत २० षटकात ९ विकेट गमावत १४४ धावा केल्या. आता पंजाबला विजयासाठी १४५ धावा कराव्या लागणार आहे.

पॉवरप्लेमध्ये राजस्थान संघाची संथ फलंदाजी झाली. राजस्थान संघाने ६ षटकात एक विकेट गमावत ३८ धावा केल्या होत्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सला पहिल्याच षटकात पहिला धक्का यशस्वी जयस्वालच्या रुपाने बसला होता. राजस्थानकडून फलंदाजी करताना रियान परागने ३४ चेंडूत ४८ धावा केल्या.

रविचंद्रन अश्विनने १९ चेंडूत २८ धावा केल्या. टॉम कोहलर कॅडमोर आणि संजू सॅमसनने प्रत्येकी १८ धावा केल्या. तर ट्रेंट बोल्ट १२ धावा करून बाद झाला. पंजाबकडून गोलंदाजी करताना सॅम करन, हर्षल पटेल आणि राहुल चहर यांनी २-२ बळी घेतले. अर्शदीप सिंग आणि नॅथन एलिस यांना १-१ विकेट मिळालीय. पंजाबचे १२ सामन्यांत ८ पॉईंट्स आहेत. तर पंजाब किंग्ज आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. पॉईंट्स टेबलमध्ये पंजाबचा संघ १० व्या स्थानावर आहे.

दोन्ही संघाचे प्लेइंग -११

पंजाब किंग्ज : प्रभसिमरन सिंग, जॉनी बेअरस्टो, रिले रुसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सॅम कुरन (कर्णधार), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, नॅथन एलिस, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युझवेंद्र चहल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कुणी फेकला रंग? खोडसाळपणा की महाराष्ट्र पेटवण्याचा डाव?

अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी; तोंडाशी मुलीचं लग्न,यवतमाळमधील शेतकऱ्याच्या मदतीला धावले आमदार शिवतारे, उचलणार लग्नाचा खर्च

Maharashtra Politics: फडणवीसांनी फुंकलं पालिकेचं रणशिंग, ठाकरे ब्रँडवरून राजकारण पेटलं, कुणाचा ब्रँड? कुणाचा वाजणार बँड?

वेळ येणार, धरणे आणि संपूर्ण जम्मू-काश्मीर...; पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडची भारताला धमकी

Ajit Pawar Distributes Kunbi Certificates: मराठवाड्यात कुणबी दाखल्यांचं वाटप सुरू, भुजबळांचा सवाल – दाखले आधीच शोधून ठेवले होते का?

SCROLL FOR NEXT