RCB vs RR cricket news  Saam tv
Sports

राजस्थान रॉयल्सच्या विजयाने पॉइंट्स टेबलमध्ये उलटफेर; कोणत्या संघाला झाला फायदा?

RCB vs RR : आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स विजयाने पॉइंट्स टेबलमध्ये उलटफेर झालाय. राजस्थान रॉयल्सचा विजय झाल्याने पंजाब किंग्सलाही चांगला फायदा झाला आहे.

Vishal Gangurde

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना झाल्यानंतर पॉइंट टेबलमध्ये बदल

पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स आघाडीवर

राजस्थान रॉयल्सच्या विजयाचा पंजाब किंग्सला फायदा

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विरोधात राजस्थान रॉयल्स संघाच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. आरसीबीने राजस्थान रॉयल्सला २०२ धावांचं आव्हान दिलं. आरसीबीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सच्या टीमने पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फेरबदल केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पराभव झाल्यानंतर पॉइंट टेबलमध्ये पंजाब किंग्सला चांगला फायदा झाला आहे.

आरसीबीच्या विरोधात राजस्थान रॉयल्सने चौकार लगावून विजय निश्चित केला. या विजयामुळे राजस्थान रॉयल्स पॉइंट टेबलमध्ये ८ अंकासहित पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. तर पंजाब किंग्स टीम ५ अंकानी दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. तर दिल्ली कॅपिटल्स चौथ्या स्थानावर आहे. तर लखनौ सुपर जायंट्स पाचव्या क्रमांकावर आहे.

चेन्नई सुपर किंग्स दहाव्या स्थानावर आहे. कोलकाता नाइट रायडर्स नवव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स टीम आठव्या स्थानावर आहे. या तिन्ही संघाने १८ पैकी १३ सीझन जिंकले आहेत. परंतु या सीझनमध्ये चांगली कामगिरी करताना दिसत नाहीए. गुजरात टायटन्स ७ व्या क्रमांकावर तर सनराजर्स हैदराबाद टीम सहाव्या स्थानावर पोहोचली आहे.

तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात शुक्रवारी रात्री झालेला सामना अतितटीचा झाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने बाजी मारली. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने २०२ धावांचं आव्हान हे १८ षटक ४ चेंडूत राजस्थान रॉयल्सने पूर्ण केले. या सामन्याचा हिरो वैभव सूर्यवंशी ठरला. वैभवने २६ चेंडूत ७८ धावा कुटल्या. ध्रुव जुरेल याने ४३ चेंडूत ८१ धावा केल्या. दोघांच्या आक्रमक खेळीमुळे राजस्थान रॉयल्सचा विजय सोपा झाला. या सीझनमध्ये सलग दोन वेळा विजय मिळवल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thick Hair Tips : तुम्हालाही लांब, घनदाट आणि मजबूत केस हवेत? मग हे ६ घरगुती उपाय नक्की करा

Maharashtra News Live Update: उरळी कांचन येथे लक्ष्मण हाके यांच्या मोर्चामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी

Krishna Janmashtami 2026: यंदाच्या जन्माष्टमीला द्वापार युगासारखा दुर्मिळ महासंयोग! ४ राशींचं उजळणार भाग्य

Mangalsutra Designs: नवरा- बायकोच्या नावाचं मंगळसूत्र, या 5 डिझाईन्स पाहून प्रेमात पडाल

Thyroid Health : तुमचंही वजन विनाकारण वाढतंय? 'या' ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकतो थायरॉईड

SCROLL FOR NEXT