rajasthan royals twitter
Sports

Rajasthan Royals Captain: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार बदलला! Sanju Samson ने केली घोषणा; कोणाला मिळाली जबाबदारी?

New Captain Of Rajasthan Royals: आयपीएल २०२५ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना राजस्थान रॉयल्सने आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेला येत्या २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्याने सुरुवात होणार आहे. राजस्थान रॉयल्स संघाचा पहिला सामना २३ मार्चला सनराजझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी संघाचा कर्णधार संजू सॅमसनने मोठी घोषणा केली आहे. सुरुवातीच्या ३ सामन्यांसाठी राजस्थान रॉयल्सने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे.

आयपीएल २०२५ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. दरम्यान ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सच्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. सुरुवातीच्या ३ सामन्यांमध्ये रियान पराग राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व करताना दिसेल.

रियान परागकडे राजस्थान रॉयल्सची जबाबदारी

राजस्थान रॉयल्सने व्हिडिओ शेअर करुन संघाच्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. रियान पराग गेल्या काही वर्षांपासून या संघाकडून खेळतोय. यासह त्याच्याकडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये संघाचं नेतृत्व करण्याचाही अनुभव आहे. रियानच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत ७० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याला ११७३ धावा करता आल्या आहेत.

घोषणा करताना काय म्हणाला संजू सॅमसन?

संजू सॅमसन सुरुवातीचे ३ सामने केवळ फलंदाज म्हणून खेळणार असल्याची घोषणा राजस्थान रॉयल्सकडून करण्यात आली आहे. नव्या कर्णधाराची घोषणा करताना संजू म्हणाला, 'मी पूर्णपणे फिट नसल्याने सुरुवातीचे ३ सामने खेळू शकणार नाहीये. त्यामुळे पुढील ३ सामन्यांमध्ये रियान पराग संघाचं नेतृ्त्व करेल. आम्ही त्याच्या नेतृत्वात चांगला खेळ करु. आशा करतो की, सर्वजण त्याला चांगला सपोर्ट करतील.'

राजस्थान रॉयल्स

फलंदाज

संजू सॅमसन

यशस्वी जैस्वाल

ध्रुव जुरेल

शिमरॉन हेटमायर (वेस्ट इंडिज )

शुभम दुबे

वैभव सूर्यवंशी

नितीश राणा

कुणाल राठोड

ऑल राउंडर

रियान पराग

वानिंदू हसरंगा (श्रीलंका)

गोलंदाज

संदीप शर्मा

जोफ्रा आर्चर (इंग्लंड)

महिशा तिक्षणा (श्रीलंका)

आकाश मढवाल

कुमार कार्तिकेय

युद्धवीर सिंग चरक

तुषार देशपांडे

फझलहक फारुखी (अफगाणिस्तान)

क्वेंना मफाका (साऊथ आफ्रिका)

अशोक शर्मा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

फलंदाज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT