SRH vs PBKS Result Marathi Saam TV
Sports

SRH vs PBKS Highlights : राहुल त्रिपाठीची धडाकेबाज खेळी; हैदराबादचा पंजाबवर ८ विकेट्सने विजय

SRH vs PBKS Match : प्रथम फलंदाजी करताना पंजाबने हैदराबादसमोर विजयासाठी १४४ धावांचे आव्हान ठेवले होते.

Satish Daud

SRH vs PBKS Match Updates : आयपीएलमध्ये आजचा दुसरा सामना सनराईज हैदराबाद आणि पंजाब किंग्ज या दोन संघादरम्यान झाला. या सामन्यात हैदराबादने पंजाबवर ८ विकेट्सनी विजय दणदणीत मिळवला. यंदाच्या हंगामातील हैदराबादचा हा पहिलाच विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने हैदराबादसमोर विजयासाठी १४४ धावांचे आव्हान ठेवले होते. हैदराबादने हे आव्हान १७ चेंडू आणि ८ विकेट्स राखून पूर्ण केलं.  (Latest sports updates)

हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने ४८ चेंडूत नाबाद ७४ धावांची खेळी केली. त्याला कर्णधार एडम मार्करमने २१ चेंडूत नाबाद ३७ धावा चांगली साथ दिली. पंजाबने दिलेल्या १४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सनराइजर्स हैदराबादची सुरूवात अत्यंत खराब झाली होती.

सलामीवर मयांक अग्रवाल आणि हॅरी ब्रुक स्वस्तात माघारी परतले. ब्रुकने १३ तर मयांकने २१ धावा केल्या. दोघेही बाद झाल्यानंतर हैदराबादचा डाव कोसळणार की काय असे वाटत होते. पण राहुल त्रिपाठीने मोर्चा सांभाळला. (IPL 2023)

राहुल त्रिपाठी आणि एडन मार्करम यांनी शतकी भागीदारी करत पंजाबला विजय मिळवून दिला. राहुल त्रिपाठी याने ४८ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. तर एडन मार्करम याने ३७ धावांचे योगदान दिले. पंजाबकडून अर्शदीप सिंह आणि राहुल चाहर यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

तत्पुर्वी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाब किंग्जची सुरूवात अतिशय निराशाजनक झाली. मागच्या सामन्यात (IPL 2023) विस्फोटक खेळी करणाऱ्या प्रभसिमरनला भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर बाद केले. त्यापाठोपाठ मार्को यान्सनने मॅट शॉर्ट आणि जितेश शर्माला झटपट माघारी पाठवलं.

त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या सॅम करनने शिखर धवनला साथ देत पंजाबचा डाव पुढे नेला. सॅम करन मयांक मार्कंडेच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. त्यानंतर एकापाठोपाठ पंजाबचे गडी बाद होत गेले. एकवेळी पंजाबची अवस्था ९ बाद ८८ झाली होती.

मात्र, शिखर धवनने तळातील फलंदाजाला हाताशी धरत पंजाबचा डाव पुढे नेला. शिखर धवनने ६६ चेंडूत नाबाद ९९ धावांची झुंजार खेळी केली. त्यामुळे पंजाबला सन्माजनक धावसंख्या उभारता आली. हैदराबादकडून मयांक मार्कंडेने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक; रमजानमध्ये झालेल्या भीषण हल्ल्यात १७ जणांचा मृत्यू

Bribe Case: मोठी बातमी! फाईल पुढे सरकवण्यासाठी ठेकेदाराकडे पैशांची मागणी; 1 लाख 30 हजारांची लाच घेताना मनपा कंत्राटी अभियंत्याला रंगेहाथ पकडलं

३ मुलांना विष पाजले, बायकोचा गळा चिरला आणि स्वत:ला गळफास लावला, कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; टोकाचे पाऊल का उचलले?

Horoscope: करिअरमध्ये प्रगती साधाल; यश, उन्नतीचे नवीन मार्ग मिळतील

SCROLL FOR NEXT