indian cricket team twitter
Sports

IND vs SA: टीम इंडियाच्या विजयाचा अनसंग हिरो! वर्ल्डकप विजयानंतर राहुल द्रविडकडून हटके सेलिब्रेशन; पाहा VIDEO

India vs South Africa, Rahul Dravid Celebration: बारबाडोसच्या मैदानावर भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी -२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. दरम्यान या विजयानंतर राहुल द्रविडने केलेल्या हटके सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

भारतीय क्रिकेट फॅन्स २९ जूनची रात्र कधीच विसरू शकणार नाहीत. तब्बल ११ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय संघाला आयसीसी टी -२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावण्याची संधी मिळाली आहे. फायनलमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. यासह दुसऱ्यांदा टी -२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली आहे.

हा वर्ल्डकप मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडसाठी शेवटचा वर्ल्डकप ठरला आहे. वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेनंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपला होता. मात्र या कार्यकाळ टी -२० वर्ल्डकपपर्यंत वाढवण्यात आला. राहुल द्रविड यांनी २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांना एकदाही वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय अंडर १९ संघाने जेतेपदावर नाव कोरलं. त्यानंतर २०२१ मध्ये त्यांना भारतीय संघाला प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली.

राहुल द्रविड यांचा पायगुण भारतीय संघासाठी गुडलक तर ठरला, मात्र दोन वेळेस फायनलमध्ये जाऊन भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. २०२३ मध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तर नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या फायनलमध्ये वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

भारताच्या विजयानंतर राहुल द्रविड यांचा जल्लोष

भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी -२० वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. दरम्यान ट्रॉफी स्वीकारल्यानंतर विराटने ट्रॉफी राहुल द्रविड यांच्या हातात दिली. त्यावेळी राहुल द्रविड जोरदार जल्लोष साजरा करताना दिसून आले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cough Syrup: जीवघेण्या कफ सिरफ कंपनीच्या मालकाला अखेर अटक, औषधामुळे २० मुलांचा मृत्यू

Kanpur Blast: रस्त्याच्या कडेला उभ्या बाईकमध्ये अचानक मोठा स्फोट, ८ जण गंभीर जखमी; नेमकं काय घडलं?

OBC आरक्षण संपवल्यात जमा..., व्हॉट्सअप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या; मुख्यमंत्र्यांना केली विनंती

Kantara Chapter 1 Collection : बॉक्स ऑफिसवर 'कांतारा' चं तुफान, आठवड्याभरात पार केला 300 कोटींचा टप्पा

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये असदउद्दीन ओवेसीची आज होणार सभा

SCROLL FOR NEXT