R Praggnanandhaa Saam Tv
Sports

R Praggnanandhaa : पॅरासिन ओपन बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा प्रज्ञानानंद 'अजिंक्य'; रचला इतिहास

प्रज्ञानानंद याने वयाच्या १२ वर्षे, १० महिने आणि १३ दिवसांत ग्रँडमास्टरची पदवी प्राप्त केली होती. तो भारताचा सर्वात तरुण ग्रँडमास्टर आहे.

Siddharth Latkar

नवी दिल्ली : देशाचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याने (R Praggnanandhaa) पॅरासिन ओपन 'ए' बुद्धिबळ (Paracin Open 'A' chess tournament 2022) स्पर्धेत विजय (victory) मिळविला. त्याने या स्पर्धेत आठ गुणांची कमाई करुन हे यश मिळविलं आहे. या यशाबद्दल त्याचे देशभरात (india) काैतुक हाेत आहे. प्रज्ञानानंद यास बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांचे मार्गदर्शन लाभले आहे. (R Praggnanandhaa Latest Marathi News)

या स्पर्धेत प्रज्ञानानंदने सर्व सामने जिंकले. त्याने एलेक्झांडर प्रेडके यास पिछीडीवर टाकले. प्रेडके याने ७.५ गुण मिळविले. ताे द्वितीय स्थानावर राहिला. या स्पर्धेत कझाकस्तानच्या अलीशेर सुलेमेनोव्हनं तृतीय क्रमांक मिळविला आहे. अलीशेर याचा एएल मुथय्या या भारतीय खेळाडूसमवेतचा सामना बराेबरीत सुटला.

या स्पर्धेत भारताचा व्ही प्रणवला प्रेडकेने पराभवचा धक्का दिला. त्यामुळे त्याचे आव्हान ६.५ गुणांसह संपुष्टात आले. तसेच ग्रँडमास्टर अर्जुन कल्याण (६.५ गुण) हा सातव्या स्थानावर राहिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

किडनी खराब होऊ नये म्हणून दिवसभरात किती पाणी प्यावे?

Maharashtra News Live Update: जळगाव महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात

Gold Rate Today: सोन्याला चकाकी! १० तोळा ७,७०० रुपयांनी वाढले; 18K- 22K आणि 24K चे आजचे दर वाचा

Ratnagiri : रत्नागिरीत भयंकर घडलं! सकाळी झोपेतून लवकर उठवल्याने सुनेची सटकली, सासूच्या डोक्यात फळी घातली नंतर...

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्यवसाय क्षेत्रात एन्ट्री; मुंबईजवळ सुरू केले हॉटेल, VIDEO चर्चेत

SCROLL FOR NEXT