R ASHWIN yandex
Sports

IND vs BAN: पहिल्याच सामन्यात R Ashwin इतिहास रचणार! दिग्गज गोलंदाजाला मागे सोडणार

R Ashwin Record In WTC: भारताचा अनुभवी गोलंदाज आर अश्विनला बांगलादेशविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नईत रंगणार आहे. हा सामना भारतीय संघातील फिरकी गोलंदाज आर अश्विनसाठी अतिशय खास असणार आहे. कारण या सामन्यात अश्विनला एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या पहिल्या कसोटीत अश्विनला मोठ्या रेकॉर्डमध्ये नंबर १ बनण्यासाठी केवळ ५ गडी बाद करायचे आहेत. बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटीत जर त्याने ५ गडी बाद केले, तर या स्पर्धेत सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी पोहोचणार आहे.

आतापर्यंत आर अश्विन आणि ऑस्ट्रेलियाचा अनुभवी गोलंदाज नॅथन लायनने प्रत्येकी १०-१० वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. जर अश्विनने या सामन्यात ५ गडी बाद केले, तर तो लायनला मागे सोडत सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करणारा गोलंदाज ठरेल. यासह आर अश्विन हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत १७४ गडी बाद केले आहेत.

असा रेकॉर्ड करणारा पहिलाच भारतीय गोलंदाज

आर अश्विन हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत १७४ गडी बाद केले आहेत. यासह या स्पर्धेत सर्वात जलद १५० चा आकडा गाठणारा तो पहिलाच गोलंदाज आहे. यासह ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि नाथन लायन यांच्या नावे देखील १५० पेक्षा अधिक गडी बाद करण्याची नोंद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT