R ASHWIN  saam tv
Sports

R Ashwin On WTC Final: अखेर मौन सोडलं... WTC च्या अंतिम सामन्यात संधी न मिळाल्याबद्दल अश्विनने केलं मोठं विधान

R Ashwin Reaction: हा सामना झाल्यानंतर आता आर अश्विनने मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

IND VS AUS WTC FINAL 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. लंडनच्या ओव्हल मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे.

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ४४४ धावांची गरज होती. मात्र भारतीय संघाला अवघ्या २३४ धावा करता आल्या. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने आश्चर्यकारक निर्णय घेतला होता.

त्याने कसोटीतील नंबर १ गोलंदाज आर अश्विनला संघाबाहेर ठेवलं होतं. अश्विनला संघाबाहेर ठेवल्याने अनेक दिग्गजांनी कर्णधार रोहित शर्मावर टीका केली होती. दरम्यान हा सामना झाल्यानंतर आता आर अश्विनने मोठं वक्तव्य केलं आहे.

आर अश्विनचं मोठं वक्तव्य..

या सामन्यानंतर बोलताना आर अश्विन म्हणाला की,'सामन्याचा शेवट अशाप्रकारे होणं आमच्यासाठी निराशाजनक आहे. गेल्या २ वर्षातील हा उत्तम प्रयत्न होता.' आर अश्विन हा कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने ९२ कसोटी सामन्यांमध्ये ४७४ गडी बाद केले आहेत.

तरीदेखील त्याला या सामन्यासाठी प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं नव्हतं. अश्विन संघाबाहेर आहे, हे पाहून दोन्ही देशातील दिग्गज खेळाडूंनी नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले होते.

अश्विनला संघाबाहेर का ठेवलं असा प्रश्न जेव्हा राहुल द्रविड यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की , पावसाचं वातावरण असल्याने ४ वेगवान गोलंदाजांना संधी दिली गेली आहे. (Latest sports updates)

आर अश्विनचा दमदार रेकॉर्ड..

आर अश्विनने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१-२३ स्पर्धेतील १३ सामन्यांमध्ये ६१ गडी बाद केले आहेत. तर त्याच्या कसोटी क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ९२ कसोटी सामन्यांमध्ये ४७४ गडी बाद केले आहेत.

तर फलंदाजी करताना त्याने ३१२९ धावा केल्या आहेत. आपल्या कसोटी कारकिर्दीत त्याने एकूण ५ शतके झळकावली आहेत. १२४ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. तर वनडे क्रिकेटमधील कामगिरी बद्दल बोलायचं झालं तर त्याने ११३ सामन्यांमध्ये १५१ गडी बाद केले आहेत.

तर ६५ टी-२० सामन्यांमध्ये त्याच्या नावे ७२ गडी बाद करण्याची नोंद आहे. वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना त्याने ७०७ धावा केल्या आहेत. तर टी-२० क्रिकेटमध्ये त्याने १८४ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT