rr vs pbks  Twitter
क्रीडा

IPL 2023 RR VS PBKS : पंजाबचे 'किंग्ज' पडले राजस्थानच्या 'रॉयल्स' वर भारी! रोमांचक सामन्यात ५ धावांनी विजयी

Ankush Dhavre

IPL 2023 RR VS PBKS : आयपीएल २०२२ स्पर्धेतील आठव्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

या रोमांचक सामन्यात शेवटच्या २ चेंडूंमध्ये राजस्थान रॉयल्स संघाला ११ धावांची गरज होती. मात्र सॅम करनने अप्रतिम गोलंदाजी करत पंजाब किंग्ज संघाला ५ धावांनी विजय मिळवून दिला.(RR VS PBKS HIGHLIGHTS)

पहिल्या डावात पंजाबने उभारला १९७ धावांचा डोंगर..

या सामन्यात नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या पंजाब किंग्ज संघाने जोरदार सुरुवात केली होती. पंजाब संघाकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक ८६ धावांची खेळी केली. तर प्रभसिमरनने त्याला चांगली साथ देत ६० धावांचे योगदान दिले.

या दोघांच्या तुफानी खेळीच्या जोरावर पंजाब किंग्ज संघाने २० षटक अखेर ४ गडी बाद १९७ धावा उभारल्या होत्या.

राजस्थान रॉयल्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९३ धावांची गरज होती. हा धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघातील वरच्या फळीतील फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही.

संजू यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर स्वस्तात माघारी परतले होते. कर्णधार संजू सॅमसन ४२ तर शेवटी हेटमायरने ताबडतोब ३६ धावांची खेळी केली. मात्र राजस्थानचा संघ विजयापासून ५ धावा दूर राहिला. (Latest sports updates)

दोन्ही संघांची प्लेइंग 11:

पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शाहरुख खान, सॅम करन, सिकंदर रझा, नॅथन एलिस, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युझवेंद्र चहल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT