Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Qualifier1 saam Tv
Sports

RCB vs PBKS: IPL मध्ये पंजाबबाबत पहिल्यांदा असं घडलं; तुटला १७ वर्ष जुना रेकॉर्ड

Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Qualifier 1: आयपीएल २०२५ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्जच्या फलंदाजांनी लाजिरवाण्या कामगिरी केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध पंजाबचा संघ फक्त १०१ धावांवर गुंडाळला गेला.

Bharat Jadhav

आयपीएल २०२५ च्या पहिल्या क्वालिफायर-1मध्ये पंजाब किंग्स आणि आरसीबी संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पंजाबचा दारूण पराभव झाला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विरुद्धात पंजाब संघाने सर्वात खराब कामगिरी केली. चंदीगडमधील मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंजाबचा डाव लवकरच आटोपला.

संपूर्ण संघ २० षटकेही खेळू शकला नाही. त्यामुळे त्यांच्या नावावर एक नको असलेला रेकॉर्ड नोंदवण्यात आला. आरसीबीने १० षटकांत २ गडी गमावून १०६ धावा करत सामना सहज जिंकला. आरसीबी संघ आता ३ जून रोजी अहमदाबाद येथे अंतिम सामना खेळेल. पंजाब संघ १ जून रोजी त्याच मैदानावर क्वालिफायर-२ मध्ये खेळणार आहे.

स्टार फलंदाज अपयशी

आयपीएलमध्ये पंजाब किंग्सचा हा चौथा सर्वात कमी स्कोअर आहे. त्यांच्याकडून या सामन्यात मार्कस स्टोयनिसने २६, अझमतुल्लाह उमरझाईने १८ आणि प्रभसिमरन सिंगने १८ धावा केल्या. त्यानंतर नेहल वढेरा ८, प्रियांश आर्य ७, जोश इंग्लिश ४ आणि श्रेयस अय्यर २ धावा करून बाद झाले. शशांक सिंगच्या बॅटमधून फक्त ३ धावा आल्या. आरसीबीकडून जोश हेझलवूड आणि सुयश शर्मा यांनी ३-३ विकेट घेतल्या.

२००८ चा विक्रम मोडला

११ वर्षांनंतर प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या पंजाब संघासाठी फक्त तीन फलंदाजांना दुहेरी अंक गाठता आला. पंजाब संघ आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वात कमी ओव्हरमध्ये ऑलऑऊट होणारा संघ बनलाय. तसेच पंजाबच्या संघाने १७ वर्ष जुना रेकॉर्ड तोडलाय. २००८ च्या नॉकआउट सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा संघ राजस्थान रॉयल्सच्या विरुद्ध १६.१ षटकामध्ये बाद झाला होता.

IPL प्लेऑफमधील सर्वात कमी धावसंख्या करणारे संघ

डेक्कन चार्जर्स विरुद्ध आरसीबी, डीवाय पाटील, २०१० (तिसरे स्थान प्लेऑफ) - ८२ धावा

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स - मुंबई, २००८ (सेमीफायनल) - ८७ धावा

लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स चेन्नई २०२३ (एलिमिनेटर) - १०१ धावा

पंजाब किंग्ज विरुद्ध आरसीबी, मुल्लानपूर, २०२५ (क्वालिफायर १) - १०१ धावा

डेक्कन चार्जर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, डीवाय पाटील, २०१० (सेमीफायनल) - १०४ धावा

सर्वात कमी धावसंख्येवर पंजाब किंग्स ऑलऑउट

२०१७मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स विरुद्ध खेळताना पंजाबचा संघ ७३ धावांवर बाद झाला होता.

२०१५ मध्ये आरसीबीविरुद्ध खेळताना पंजाबचा संघ ८८ धावांवर बाद झाला होता.

२०१८ मध्ये आरसीबीविरुद्ध खेळताना पंजाबचा संघ ८८ धावांवर बाद झाला होता.

२०२५मध्ये आरसीबीविरुद्ध खेळताना पंजाबचा संघ १०१ धावांवर बाद झाला.

२०२५ मुल्लांपूरमध्ये कोलकाता नाइटरायडर्सविरुद्ध खेळताना पंजाबचा संघा १११ धावांवर बाद झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT