PBKS Shreyas Iyer vs SRH/IPL/X Saam tv
Sports

PBKS vs SRH : सरपंचाची दबंगगिरी; पंजाबच्या ३ धुरंधरांनी हैदराबादला कुटून काढलं, २२० धावांचं आव्हान पार करून रोवला विजयाचा झेंडा

pbks vs srh punjab kings chase 220 to defeat sunrisers hyderabad ipl 2026 : पंजाब किंग्जचा सरपंच श्रेयस अय्यर, प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग या तीन धुरंधरांनी ठोकलेल्या तुफानी अर्धशतकांच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादला धूळ चारली. २२० धावांचं आव्हान सहज पार करत विजयाचा झेंडा रोवला.

Nandkumar Joshi

आयपीएलमध्ये आज, शनिवारी पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात जबरदस्त लढत झाली. या सामन्यात पंजाब किंग्ज 'धुरंधर' ठरला. कर्णधार श्रेयस अय्यर, प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग यांनी केलेल्या तुफानी फटकेबाजीमुळं पंजाबच्या संघानं २२० धावांचं बलाढ्य लक्ष्य सहज पार करत हैदराबादवर विजय मिळवला. हैदराबादच्या अभिषेक शर्मा याची ७४ धावांची विस्फोटक खेळी व्यर्थ ठरली.

आयपीएलच्या १९ व्या मोसमातील १७ वा सामना न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर क्रिकेट स्टेडियममध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाला. पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर यानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून २१९ धावांचा डोंगर उभारला.

हैदराबादकडून अभिषेक शर्मानं तुफानी फलंदाजी केली. अवघ्या २८ बॉलमध्ये ८ उत्तुंग षटकार आणि ५ चौकार ठोकून ७४ धावा केल्या. ट्रॅविस हेड याने ३८ धावा केल्या. तर क्लासेन यानं ३९ धावा कुटल्या. पंजाबच्या शशांक सिंह आणि अर्शदीप सिंग या दोघांनी प्रत्येकी दोन विकेट, तर जेव्हियर बार्टलेट याने एक विकेट घेतली.

हैदराबादने पंजाबसमोर २२० धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे आव्हान पंजाबने १९ व्या ओव्हरमध्येच पार केलं. पंजाबने आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा इतक्या मोठ्या धावसंख्येचं आव्हान पार केले आहे. कर्णधार अय्यरसह प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंह यांनी अर्धशतके ठोकली. प्रियांशने २० बॉलमध्ये ५७ धावा, प्रभसिमरन यानं २५ बॉलमध्ये ५१ धावा, तर अय्यरने ३३ बॉलमध्ये ६९ धावा कुटल्या.

अय्यरने ५ चौकार आणि ५ षटकार ठोकले. प्रियांश आणि प्रभसिमरन यांनी सलामीला येत धुवांधार सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी ९९ धावांची भागीदारी रचली. कोनोली (११) स्वस्तात बाद झाला. पंजाबचे तिन्ही तगडे फलंदाज शिवांग कुमारने बाद केले. अय्यरने नेहल वढेरा याच्यासोबत मिळून लढा दिला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी रचली. शशांक सिंह यानं नाबाद १४ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमधील कमलादेवी कॉलेजच्या विरोधात आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन

पुरोगामी वारकरी प्रतिगामी झाले, शरद पवारांचा धर्मांधांना टोला

ऑपरेशन टायगरच्या चर्चांनंतर उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर; खासदार सावंतांना मातोश्रीवरून आदेश, नेमकं काय घडलं?

चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोग अध्यक्षपदी कोण? प्रशासकीय कामाचा अनुभव असलेल्या महिला नेत्यानं व्यक्त केली इच्छा

प्रादेशिक पक्षाला मोठा झटका! प्रदेशाध्यक्षाचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT