cricket kit saam tv
Sports

Cricket Kit Prize: विराट, रोहितसारखे दिग्गज क्रिकेटर्स वापरतात त्या हेल्मेट अन् ग्लोव्ह्जची किंमत किती?

Helmet And Gloves Prize: वाचा किती असते किंमत

Ankush Dhavre

Helmet And Gloves Prize:

क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. या खेळाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तसेच क्रिकेटपटूंची लोकप्रियता देखील दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. क्रिकेट फॅन्सला आपल्या आवडत्या खेळाडूंविषयी सर्व काही जाणून घ्यायचं असतं. दरम्यान प्रोफेशनल क्रिकेटपटू जे हेल्मेट आणि ग्लोव्ह्ज घालतात त्याची किंमत किती असते माहितेय का? जाणून घ्या.

हेल्मेटची किंमत किती..?

क्रिकेट लेदर बॉलने खेळलं जातं. हा बॉल डोक्याला लागल्याने गंभीर इजा होऊ शकते. त्यामुळे हेल्मेटचा वापर केला जातो. हेल्मेट घातल्याने डोक्याला बॉल लागण्याचा धोका नसतो. प्रोफेशनल क्रिकेटपटू जे हेल्मेट वापरतात त्याची किंमत २००० ते २०,००० पेक्षाही अधिक असू शकते. हेल्मेटची किंमत ही त्याच्या क्वालिटीवरून आणि ब्रँडवरून ठरते. ( Latest sports updates)

ग्लोव्ह्जची किंमत किती?

हेल्मेटसह ग्लोव्ह्जची किंमतही जास्त असते. प्रोफेशनल क्रिकेटपटू जे ग्लोव्ह्ज वापरतात त्याची सुरूवात २००० पासून होते. ही किंमत १०,००० पर्यंत जाऊ शकते. ग्लोव्ह्जची किंमतही त्याच्या ब्रँडवरून आणि क्वालिटीवरून ठरते.

काय सांगतो आयसीसीचा नियम..?

क्रिकेटमध्ये अनेकदा हेल्मेट न घातल्यामुळे मृ्त्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी आयसीसीने फलंदाजांना हेल्मेट घालून खेळणं बंधनकारक केलं आहे. या नियमानूसार हेल्मेट बनवताना ब्रिटिश मानक BS7928:2013 चे पालन करावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Constable Death Case: पत्नीनं पोलीस नवऱ्याचा घेतला जीव? पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनं पालघरमध्ये खळबळ

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कृषी योजनांचा लाभ मिळवायचाय? ई-केवायसी अन् फार्मर आयडी आहे गरजेचं

Weather Update: सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणार धुव्वाधार पाऊस; १६ राज्यांसाठी पावसाचा अलर्ट

तुमच्या सौंदर्यावर पाकचा क्रिम 'बॉम्ब', आरोग्याला घातक उत्पादनांची महाराष्ट्रात घुसखोरी

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणामागे मोदींचा डाव? डिलिमिटेशनसाठी नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT