prithvi shaw twitter
Sports

Yuzvendra Chahal: क्रिकेट सोडून पेट्रोल भरु लागला पृथ्वी शॉ! इंग्लंडमधील तो Photo होतोय व्हायरल

Yuzvendra Chahal Funny Post For Pritvhi Shaw: भारतीय संघातील फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने पृथ्वी शॉचा एक फोटो शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

भारतीय संघातील स्टार फलंदाज पृथ्वी शॉ आणि स्टार गोलंदाज युजवेंद्र चहल दोघेही इंग्लंडमध्ये आहेत. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या काऊंटी क्रिकेट स्पर्धेत हे दोघेही नॉर्थेम्पटनशायर संघाकडून खेळत आहे.

दोघेही मैदानाबाहेर अनेकदा मस्ती करताना दिसून येत असतात. या दोघांचे अनेक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान सामन्यानंतर फिरत असताना, युजवेंद्र चहलने पृथ्वी शॉ चा एक फोटो शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

चहलने शेअर केला फोटो

आपल्या मजेशीर स्वभावासाठी ओळखला जाणाऱ्या चहलने यावेळी पृथ्वी शॉ ची फिरकी घेतली आहे. दोघेही इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धेतील सामना पाहण्याासाठी गेले होते. दरम्या कारमधून जात असताना, पृथ्वी शॉ स्वत: आपल्या कारमध्ये पेट्रोल भरत होता.

हे पाहताच, चहलने त्याचा फोटो क्लिक केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. पृथ्वी शॉ ने हा फोटो पाहताच प्रतिक्रिया दिली. त्याने प्रतिक्रिया देत, 'अरे यार..'असं लिहिलं आहे.

पृथ्वी शॉची बॅट तळपली

भारतीय संघातून बाहेर असलेला पृथ्वी शॉ भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी पूर्ण जोर लावताना दिसून येतोय. त्याला आयपीएल २०२४ स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. मात्र वनडे कप २०२४ स्पर्धेत त्याने शानदार कामगिरी करुन दाखवली आहे. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

आतापर्यंत खेळलेल्या ८ सामन्यांमध्ये त्याने ४२.८७ च्या सरासरीने ३४३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ अर्धशतकं झळकावली आहेत. यादरम्यान ९७ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली आहे.

यासह युजवेंद्र चहलने देखील या स्पर्धेत शानदार कामगिरी करुन दाखवली आहे. त्याला टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात संधी मिळाली होती. मात्र या स्पर्धेत त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. दरम्यान संघाबाहेर असताना तो पृथ्वी शॉ सोबत इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळतोय. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात ५ गडी बाद केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : अल्पवयीन मुलीला फ्लाईंग किस देणं पडलं महागात, तरुणाला भोगावा लागणार ३ वर्षाचा तुरुंगवास

Maharashtra Live News Update: अमोल कोल्हे यांचा गौप्य स्फोट

AI इम्पॅक्ट समिटमध्ये PM मोदींविरोधात घोषणा, युवा काँग्रेसच्या आंदोलनामागचं कारण काय?

Spinach Paneer Toast Recipe: पिझ्झा-बर्गर विसरून जाल! मुलांसाठी बनवा सुपर हेल्दी क्रिस्पी पालक पनीर टोस्ट; रेसिपी आहे एकदम सोपी

Tata Punch EV Price: 15 मिनिटांत चार्ज होणारी टाटा पंच इलेक्ट्रिक भारतात लॉन्च; परवडणारी किंमत, 468 KM रेंज अन् बरंच काही, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT