Mahila Maharashtra Kesari Spardha, Sangli, Kalyan, pratiksha bagdi, vaishnavi patil saam tv
Sports

Mahila Maharashtra Kesari Spardha : मीच मैदान मारणार ! पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीची आज अंतिम लढत

या स्पर्धेतील विजेत्या मल्लास चांदीची गदा आणि मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

विजय पाटील

Sangli : पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीचा (Women Maharashtra Kesari) किताब काेण पटकाविणार याची उत्सुकता संपुर्ण राज्याला लागून राहिली आहे. सांगलीच्या प्रतीक्षा बागडी (pratiksha bagdi) आणि कल्याण येथील वैष्णवी पाटील (vaishnavi patil) यांच्यात महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत मिरज येथील जिल्हा क्रीडा संकूलात हाेणार आहे. (Breaking Marathi News)

महाराष्ट्रातील पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीत गुरुवारपासून रंगली आहे. या स्पर्धेत राज्यातील नामवंत मल्ल आपले काैशल्य सिद्ध करीत आहेत. ही स्पर्धा पाहण्यासाठी कुस्तीशाैकिनांची पावले सांगलीत वळू लागल्याचे चित्र आहे.

सांगलीच्या प्रतीक्षा आणि कल्याणची वैष्णवी यांच्यात महाराष्ट्र केसरीसाठीची अंतिम लढत हाेणार आहे. आज सायंकाळी ही लढत हाेणार आहे. महाराष्ट्र केसरीची पहिली गदा पटकाविण्यासाठी दाेन्ही मल्ल उत्सुक आहेत. दाेन्ही मल्लांनी गदा जिंकण्याचा विश्वास साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केला.

तुंग येथील प्रतीक्षा रामदास बागडी म्हणाली माझा कष्टावर विश्वास आहे. मला प्रतिस्पर्धी मल्लाचे डाव पेच माहिती आहेत. आपल्याच जिल्ह्यात अंतिम लढत असल्याने थाेडा दबाव आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे सर्वांच्या माझ्यावर अपेक्षा असणार. संध्याकाळी मी विजयी हाेईन असेही प्रतिक्षाने नमूद केले.

कल्याणची वैष्णवी पाटील म्हणाली अंतिम लढतीसाठी दाेन्ही मल्ल जय्यत तयारी करतात. आम्हांला दाेघींना एकमेकांचे डावपेच माहित आहेत. त्यामुळे आजची कुस्ती रंगतदार हाेईल. मी विजयी हाेईन याची मला खात्री आहे असेही वैष्णवीने नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sakharpuda Benefits: लग्नाआधी साखरपुडा का करतात? कारण काय ?

Vaibhav Naik: सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय तोडफोड प्रकरणी ठाकरे गटाला दिलासा; माजी आमदार वैभव नाईकांची निर्दोष मुक्तता

Gavran Pithla Bhakri: गावरान पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल पिठलं, ज्वारीच्या भाकरीसोबत आखा जेवणाचा बेत

Maharashtra Live News Update : : सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय तोडफोड प्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांची निर्दोष मुक्तता

Govt Hospital Scandal: चादर अंगावर ओढली; हॉस्पिटलच्या वेटिंग एरियातच जोडप्याने ठेवले शरीरसंबंध; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी संतापले

SCROLL FOR NEXT