Nitish rana and shikhar dhawan Twitter
Sports

PBKS VS KKR Record: IPL चे दोन नवीन कर्णधार आज येणार आमने-सामने! कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

PBKS VS KKR Head To Head Record: पंजाबचे नेतृत्व शिखर धवन तर कोलकाताचे नेतृत्व नितिश राणा करताना दिसून येणार आहे.

Ankush Dhavre

IPL 2023 Match 2 PBKS VS KKR: आयपीएल २०२३ स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

हा सामना आज दुपारी ३:३० वाजता पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ आपल्या नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहे.

पंजाबचे नेतृत्व शिखर धवन तर कोलकाताचे नेतृत्व नितिश राणा करताना दिसून येणार आहे.

पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हेड टू हेड..

आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ ३० वेळेस आमने सामने आले आहेत. ज्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० वेळेस तर पंजाब किंग्जने १० वेळा बाजी मारली आहे. (Latest sports updates)

कोणता संघ जिंकू शकतो हा सामना?

पंजाब आणि कोलकाता यांच्यात आतापर्यंत झालेल्या सामन्याचा रेकॉर्ड पहिला तर, कोलकाता नाईट रायडर्स संघाचं पारडं जड आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स हा सामना जिंकण्याची शक्यता अधिक आहे. कारण कोलकाता नाईट रायडर्स संघाने पंजाब विरुद्ध खेळताना २० सामने जिंकले आहेत.

अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:

पंजाब किंग्ज:

शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह (यष्टिरक्षक), भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, शाहरुख खान, सॅम करन, सिकंदर रजा, हरप्रीत बरार, अर्शदीप सिंग, नाथन एलिस, राहुल चाहर.

कोलकाता नाइट रायडर्स:

व्यंकटेश अय्यर, नारायण जगदीसन, नितिश राणा (कर्णधार), रहमनुल्लाह गुरबाज (यष्टिरक्षक), रिंकू सिंग, आंद्रे रसल, सुनील नारायण, उमेश यादव, शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोड़ा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : संजय राऊतांचे झोंबणारे बाण, शिंदेसेना हैराण; मेळाव्याआधी पुन्हा खऱ्या शिवसेनेवरून वाद,VIDEO

Dussehra: दसर्‍याला आपट्याचीच पाने ‘सोने’ म्हणून का लुटतात? एकमेकांना का वाटतात सोनं?

Onion Juice: जाड अन् घनदाट केस हवीयेत? लावा कांद्याचा रस, काही दिवसातच दिसेल फरक

EMI चा हप्ता थकवलात तर फोन होणार लॉक? आरबीआय नवा नियम आणणार, VIDEO

Ladki Bahin Yojana ekyc : पती, वडीलांचे e-KYC बंधनकारक; लाडकींची संख्या आणखी घटणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT