Manu Bhaker Viral Video Saam tV
Sports

Manu Bhaker: ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणाऱ्या मनू भाकरचे जबरदस्त टॅलेंट, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

Manu Bhakar Viral Video: ऑलिम्पिक नेमबाजीतील भारताची १२ वर्षांपासूनची प्रतीक्षा मनू भाकरने संपवली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर मनू भाकरवर सध्या कौतुकांचा वर्षाव होत आहे.

Priya More

भारताच्या नेमबाज मनू भाकरने (Manu Bhakar) पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये (Paris Olympic 2024) इतिहास रचला आहे. मनू भाकरने ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला नेमबाज ठरली. ऑलिम्पिक नेमबाजीतील भारताची १२ वर्षांपासूनची प्रतीक्षा मनू भाकरने संपवली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर मनू भाकरवर सध्या कौतुकांचा वर्षाव होत आहे. सध्या सोशल मीडियावर मनू भाकरचीच चर्चा होत आहे. अशामध्ये भाकरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती व्हायोलिन वाजवताना दिसत आहे.

मनू भाकरच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये ती व्हायोलिनवर राष्ट्रगीत वाजवताना दिसत आहे. हा व्हिडिओ मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील एमपी शूटिंग अकादमीचा आहे. व्हिडिओमध्ये मनू भाकर स्विमिंग पूलजवळ लॉनवर बसून व्हायोलिनवर राष्ट्रगीत वाजवताना दिसत आहे. मनूने लाल रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची पँट घातली आहे. स्पोर्टस्टारच्या रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ मे महिन्यात शूट करण्यात आला होता. मल्टी-टॅलेंटेड मनू भाकरचे आणखी एक टॅलेंट पाहून नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे.

व्हिडिओला १ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहे. तर २ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. सोशल मीडिया युजर्सनी मनू भाकरच्या जबरदस्त टॅलेंटचे कौतुक केले आहे. एका यूजरने या व्हिडओवर कमेंट्स करत मनूला बहुगुणसंपन्न म्हटले आहे. दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिले की, 'कुठल्याही गोष्टीत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी खेळ हे महत्त्वाचे क्षेत्र आहे.' मनू भास्करचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान, हरयाणच्या २२ वर्षीय मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक पटकावले. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी मनू भारताची पहिली महिला नेमबाज ठरली आहे. ऑलिम्पिक नेमबाजीतील भारताचा १२ वर्षांपासूनचा पदकाचा दुष्कार मनू भाकरने संपवला. पदक जिंकल्यानंतर मनू भाकरने सांगितले की, 'भारत या पदकाची खूप दिवसांपासून वाट पाहत होता. कारण गेल्या दोन रिओ आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे नेमबाज रिकाम्या हाताने परतले होते.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT