Manu Bhaker Saam Digital
Sports

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालं पहिलं मेडल; मनू भाकरने रचला इतिहास

Manu Bhaker Won Medal/10 Meter Air Pistol : पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतासाठी मोठी बातमी बातमी आहे. मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारत कांस्यपदक पटकावत इतिहास रचला आहे.

Sandeep Gawade

पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतासाठी मोठी बातमी बातमी आहे. भाताच्या नेमबाजांनी पहिलं मेडलं मिळवून दिलं आहे. मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारत कांस्यपदक पटकावत इतिहास रचला आहे. मनू ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय नेमबाज ठरली आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताचं हे पहिलंच पदक आहे.. मनूने अंतिम फेरीत एकूण 221.7 गुण मिळवले.

ऑलिम्पिकच्या इतिहासातील नेमबाजीतील भारताचे हे पाचवे पदक ठरलं आहे. कोरियन खेळाडू ओ ये जिनने सुवर्ण (२४३.२ गुण) आणि किम येजीने (२४१.३) रौप्यपदक पटकावलं आहे. मनू भाकर 60 शॉट्सच्या पात्रता फेरीत एकूण 580 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिली. भाकरने पहिल्या राऊंडमध्ये 97, दुसऱ्या 97, तिसऱ्यामध्ये 98, चौथ्यामध्ये 96, पाचव्यामध्ये 96 आणि सहाव्या राऊंडमध्ये 96 गुण मिळवले. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत रिदम सांगवानही सहभागी होत होती. पण रिदमला ५७३ गुणांसह १५व्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

मनू भाकरसाठी टोकियोमधील नेमबाजी स्पर्धेची अंतिम फेरी खूपच धक्कादायक ठरली होती. मेडल मिळण्याची खात्री असतानाच तिच्या पिस्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ती अंतिमफेरीत पोहोचू शकली नव्हती. या प्रकारानंतर तिला अश्रू रोखता आले नव्हते. मात्र अपेक्षेप्रमाणे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत तिने चांगली कामगिरी करत शनिवाही पहिल्याच दिवशी तिने अंतिम फेरी गाठली होती. संपूर्ण देशाकडून तिच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या. अखेर तिने हा विश्वास सार्थ ठरवत कांस्य पदकावर मोहोर उमटवली.

मनू भाकर 10 मीटर एअर पिस्टप प्रकारातील भारताची प्रसिद्ध नेमबाज आहे. 18 फेब्रुवारी 2002 रोजी हरियाणातील झज्जरमध्ये तिचा जन्म झाला आहे. लहानपणापासूनच तिला नेमबाजीत रस होता. 2018 युवा ऑलिंपिक गेम्समध्ये तीने झालेल्या 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे. तर ISSF विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदकांसह अनेक पदके मिळवली आहेत. आशियाई खेळांमध्येही पदक जिंकली असून नेमबाजीत भारतासाठी मोठं योगदान राहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT