Paris Olympics 2024 Saam Digital
क्रीडा

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बलराजने रचला इतिहात; ऑलिम्पिक स्पर्धेत असा विक्रम करणारा ठरला पहिला भारतीय

Balraj Panwar/Rowing Single Sculls : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये रोईंगमध्ये बलराज पनवारने पुरुष एकेरी स्कल्समध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. रोईंगमध्ये उपांत्यफेरी गाठणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

Sandeep Gawade

रोईंगमध्ये बलराज पनवारने पुरुष एकेरी स्कल्समध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा बलराज हा पहिला भारतीय ठरला आहे. बलराज आता मंगळवारी (३० जुलै) पुरुषांच्या एकेरी स्कल्स स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीकडे संपूर्ण भारताचं लक्ष असणार आहे. बलराजने 7 मिनिटे 12.41 सेकंदांत लक्ष्य गाठलं तर मंगोलियाच्या क्वेंटिन अँटोगानेलीने 7 मिनिटे 10:00 सेकंद वेळ नोंदवत अव्वल स्थान पटकावलं आहे. प्रत्येक रिपेचेजमधील अव्वल दोन खेळाडू उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरवले जातात.

पनवार संपूर्ण स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने 500 मीटरचे अंतर १ मिनिट 44:13 सेकंदात, 1000 मीटरचे अंतर तीन मिनिटे 33:94 सेकंदात आणि त्यानंतर 1500 मीटरचे अंतर पाच मिनिटे 23:22 सेकंदात पूर्ण केलं. यानंतर त्याने 2000 मीटर अंतर सात मिनिटे 12.41 सेकंदात पूर्ण केलं. शनिवारी याच स्पर्धेत बलराजने 7 मिनिटे 07:11 सेकंदाची वेळ नोंदवत चौथे स्थान पटकावले आणि रिपेचेज फेरी गाठली होती.

बलराज पनवार आंतरराष्ट्रीय रोईंग स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी ओळखला जातो. त्याने विविध स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या एकेरी स्कल्स स्पर्धेत त्यांने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे भारतातील अव्वल खेळाडूंमध्ये त्याची गणना होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT