Pankaj Advani Saam Tv
Sports

Asian Billiards Championship: आशियाई बिलियर्डस स्पर्धेत पंकज अडवाणी 'अजिंक्य'

विश्वविजेत्या अडवाणीने उपांत्य फेरीच्या चूरशीच्या सामन्यात चुणुक दाखविल्याने क्रीडाप्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला हाेता.

साम न्यूज नेटवर्क

दोहा : येथे झालेल्या १९ व्या आशियाई १०० यूपी बिलियर्ड्स अजिंक्यपद २०२२ स्पर्धेत (19th Asian 100 UP Billiards Championship 2022) भारताच्या (india) पंकज अडवाणीने (Pankaj Advani) अंतिम फेरीत ध्रुव सितवालाचा (Dhruv Sitwala) सहा फ्रेम्सने पराभव करून आठवे विजेतेपद पटकावले. अडवाणीचे (sports) हे २४ वे आंतरराष्ट्रीय आणि आठवे आशियाई विजेतेपद (victory) आहे. (pankaj advani latest marathi news)

दोन वेळा आशियाई बिलियर्ड्सचे अजिंक्यपद (Asian billiards champion) पटकाविणा-या सितवाला विरुद्ध खेळताना अडवाणीने पहिली फ्रेम सहज जिंकली. त्यानंतर दुसरी फ्रेम जिंकून पंकजनने २-० अशी आघाडी घेतली. तिसर्‍या फ्रेममध्ये देखील पकंजने आपले वर्चस्व कायम ठेवले. त्यानंतर सितवालाने चौथ्या फ्रेमध्ये टस्सल देत खेळात रंगत वाढवत ही फ्रेम जिंकली. पाचव्या फ्रेममध्ये पंकजने ताबा मिळवित ४-१ अशी आघाडी घेतली. ती सहाव्या फेरीतही कायम ठेवली. सातवी फ्रेम सितवालाने जिंकली परंतु पंकजने शानदार खेळ करीत सामना ६-२ असा जिंकला.

तत्पूर्वी म्यानमारच्या पोक साचे कडवे आव्हान मोडून काढत अडवाणीने ५-४ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. विश्वविजेत्या अडवाणीने उपांत्य फेरीच्या चूरशीच्या सामन्यात चुणुक दाखविल्याने क्रीडाप्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला हाेता.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Shetty House Firing Case: रोहित शेट्टी घरावर गोळीबार प्रकरणात पुणे कनेक्शन उघड, कर्वेनगरमधून चौघांना अटक

Union Budget 2026: कपडे, शूजपासून औषधांपर्यंत, अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग? वाचा संपूर्ण यादी

Kidney Failure: वारंवार थकवा जाणवतो? किडनी निकामी होण्याचे असू शकते लक्षण, वेळीच व्हा सावध अन् वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Accident News : बुलढाण्यात अपघाताचा थरार! महिला मजुरांच्या ऑटोला भरधाव कारची जोरदार धडक; ८ जण गंभीर, एका महिलेचा मृत्यू

Rohit Shetty: घराबाहेर गोळीबार झाला तेव्हा रोहित शेट्टी कुठे होता? हल्लेखोराबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT