shan masood twitter
Sports

PAK vs ENG: शान मसूद बनला मुल्तानचा सुल्तान! एका झटक्यात मोडला मोठा रेकॉर्ड

Shan Masood Record: पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने पहिल्या कसोटीतील पहिल्या दिवशी शतक झळकावत मोठ्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे.

Ankush Dhavre

Pakistan vs England 1st Test, Shan Masood Record: इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार सुरु आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना मुल्तानमध्ये सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने शानदार शतक झळकावलं आहे. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक ठरले आहे. दरम्यान या शतकी खेळीसह त्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

शानच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद मुल्तानच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात शान मसूदने शानदार सुरुवात केली. त्याने सुरुवातीपासूनच इंग्लंडच्या फलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यासह त्याने १०२ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. हे कर्णधार म्हणून त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिलंच शतक ठरलं आहे. तर कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी झळकावलेलं हे दुसरं सर्वात वेगवान शतक ठरलं आहे.

सर्वात वेगवान शतक

यजमान संघातील फलंदाजाकडून कसोटीत सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा रेकॉर्ड हा पाकिस्तानचा माजी फलंदाज मिस्बाह उल हकच्या नावावर आहे. २०१४ मध्ये फलंदाजी करताना मिस्बाह उल हकने ५६ चेंडूंचा सामना करत पाकिस्तानसाठी कसोटीतील सर्वात वेगवान शतक झळकावलं होतं. शान मसूदच्या खेळीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १७७ चेंडूंचा सामना करत १५१ धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने २ गगनचुंबी षटकार आणि १३ चौकार खेचले.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानकडून अब्दुल्ला शफीकने १०२ धावांची शानदार खेळी केली. तर शान मसूदने १५१ धावा केल्या. या खेळीच्या बळावर पाकिस्तानने पहिल्याच दिवशी ३०० धावांचा आकडा गाठला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT