Pakistan team 1hr in the dressing room. Only Indian players on the field 
Sports

IND vs PAK : पराभवानंतर पाकिस्तानचं लाजिरवाणं कृत्य, स्टेजवर गेस्ट वाट पाहत राहिले अन् पाक खेळाडू...

Pakistan Team Hides In Dressing Room : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेटने पराभव केला. पाकिस्तानला हा पराभव पचवता आला नाही. सामन्यानंतर त्यांनी असं काही केलं की सर्वजण चकीत झाले.

Namdeo Kumbhar

Ind vs Pak, Asia Cup Presentation Ceremony 2025 : आशिया चषकातील अंतिम सामन्यातील पराभव पाकिस्तानला पचवता आला नाही. तिलक वर्मा, शिवम दुबे अन् संजू सॅमसन यांच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर भारताने पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले. पण त्यानंतर पाकिस्तानच्या संघाने जे केले, त्यामुळे क्रिकेट जगतात संताप व्यक्त केला जातोय. अंतिम सामन्यानंतर होणाऱ्या सेलीब्रेशन पाकिस्तानच्या खेळाडूंकडून बॉयकॉट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रेजेंटेशन सेरेमनीसाठी इकडे सर्वजण स्टेजवर आले होते, दुसरीकडे पराभवानंतर पाकिस्तानचा संघ ड्रेसिंग रूमध्ये गेला. या लाजीरवाण्या कृत्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटले आहेत. पराभवानंतर पाकिस्तानचा संघ तासभर ड्रेसिंग रूममधून बाहेरच आला नाही. त्यांचे अध्यक्ष नकवीही सेरेमनीसाठी उपस्थित होते. इतर सर्व गेस्ट स्टेजवर वाट पाहत होते, दुसरीकडे पाकिस्तानच्या खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये आपले तोंड लपवले होते.

पाकिस्तानच्या खेळाडूंनी तोंड लपवलं -

विश्वचषक असो अथवा आशिया चषक कोणत्याही फायनल सामन्यानंतर काही वेळातच प्रेजेंटेशन सेरेमनी अर्थात पुरस्कार सोहळा होतो. पण आशिया चषक २०२५ मध्ये तसं काही झाले नाही. पाकिस्तानचा संघ पराभवानंतर ड्रेसिंग रूममध्ये तोंड लपवून बसला होता. पाकड्यांना आपला पराभव पचवता आला नाही. एक तास १६ मिनिटे पाकिस्तानचा संघ ड्रेसिंग रूमध्येच तोंड लपवून बसला होता.

आशिया चषक २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानला तीन वेळा चारीमुंड्या चीत केले. भारताने प्रत्येकवेळी पाकिस्तानची लाज काढली. कधी शेक हँड केला नाही. तर कधी फोटो काढण्यास नकार दिला. फायनल सामन्यानंतरही विजेत्या भारतीय संघाने पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हात मिळवले नाहीत. त्यानंतर पराभूत पाकिस्तानचा संघ ड्रेसिंग रूममध्ये जाऊन बसला. तासभर बाहेरचा आला नाही. स्टेजवर सर्व गेस्ट वाट पाहत राहिले अन् पाकिस्तानचा संघ तोंड लपवत राहिला.

भारताने ट्रॉफी घेण्यास दिला नकार -

आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर सव्वा तास मैदानावर ड्रामा चालला. पाकिस्तानचा संघ ड्रेसिंग रूममध्ये लपून बसला. तर दुसरीकडे भारतीय खेळाडूंनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. आशिया चषकात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हात मिळवले नाहीत, त्याशिवाय पीसीबीच्या अध्यक्षांकडून ट्रॉफीही घेतला नाही. प्रत्येकवेळा भारतीय खेळाडूंकडून पाकिस्तानचा माज जिरवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT