jasprit bumrah twitter
Sports

Viral Cricket Video: पाकिस्तानातही बुमराहची क्रेझ! चिमुकल्याचे बॉलिंग ऍक्शन पाहून वसीम अक्रमही खूश, पाहा VIDEO

Wasim Akram on Pakistani's Kid bowling action: पाकिस्तानचा चिमुकला हुबेहूब जसप्रीत बुमराह स्टाइल गोलंदाजी करतोय ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

पाकिस्तान अन् गोलंदाजाचं वेगळच कनेक्शन आहे. या पाकिस्तानने आतंरराष्ट्रीय क्रिकेटला अनेक दिग्गज गोलंदाज दिले आहेत. आता पाकिस्तानचा फ्युचर स्टारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा हुबेहूब जसप्रीत बुमराह स्टाईल गोलंदाजी करताना दिसतोय. जसप्रीत बुमराह हा आंतरराष्ट्रीय दिग्गज गोलदाजांपैकी एक आहे. भारतीय संघाला टी-२० वर्ल्डकप जिंकून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. या स्पर्धेत त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली होती.

या लहान मुलाचा व्हिडिओ पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू वसीम अक्रमने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर त्यांनी कॅप्शन म्हणून,' वाह जी वाह...या मुलाची गोलंदाजी अॅक्शन तर पाहा. हुबेहूब जसप्रीत बुमराहसारखी. माझ्यासाठी तर हा व्हिडिओ ऑफ द डे आहे. क्रिकेटला कुठलीही सीमा नसते."

हा व्हिडिओ शेअर करत वसीम अक्रम यांनी जसप्रीत बुमराहचं कौतुकही केलं आहे. त्यांच्या मते बुमराह या काळातील सर्वात खतरनाक गोलंदाज आहे. भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात जसप्रीत बुमराहने मोलाची भूमिका बजावली होती. ज्यावेळी भारतीय संघ अडचणीत असायचा त्यावेळी जसप्रीत बुमराह संघाला विकेट्स काढून द्यायचा. फायनलमध्येही त्याने मोक्याच्या क्षणी विकेट काढून दिली होती.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप झाल्यानंतर भारतीय संघातील स्टार खेळाडू सध्या व्हॅकेशन मोडमध्ये आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा परदेशात आहेत. तर जसप्रीत बुमराहला भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली होती. नुकतेच जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी संजना गणेशन यांनी राधिका मर्चंट आणि अनंत अंबानीच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scam : राज्यपालांच्या PA च्या नावाने रेल्वेच्या VVIP तिकिटांचा घोटाळा! 'लोकभवन'च्या बनावट लेटरहेडचा वापर; ७ जणांना अटक

PF Transfer : जुनं PF खाते बंद झालं? EPFO च्या नव्या पोर्टलमुळे अडकलेले पैसे, Active UAN मध्ये ट्रान्सफर करणं झाले जास्त सोपं

Maharashtra News Live Update:भिवंडी इमारत दुर्घटना; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी पाहणी, महापालिका आयुक्तांना तातडीच्या कारवाईचे आदेश

Lung cancer: तरूणांच्या शरीरात गपचूप घर करतो फु्फ्फुसांचा कॅन्सर; सुरुवातीची 5 लक्षणं वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: जांभळी साडी, नाकात नथ अन् कपाळावर चंद्रकोर; वैदेही परशुरामीचा मराठमोळा अंदाज

SCROLL FOR NEXT