IND vs PAK Cricket Fan Sold Tractor For Ticket twitter
Sports

IND vs PAK Cricket Fan: ट्रॅक्टर विकून भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकीट घेतलं; आता पश्चातापाची वेळ

IND vs PAK Cricket Fan Sold Tractor For Ticket: भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १५व्या षटकानंतर सामन्याचा कल बदलला. बुमराहाच्या गोलंदाजीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या पराभवामुळे एका चाहत्याला मोठा आर्थिक फटका बसलाय.

Bharat Jadhav

आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारताने पाकिस्तानला सातव्यांदा पराभूत केलं. टीम इंडियाच्या विजयाने भारतीय क्रिकेट चाहते आनंदी झाले. परंतु एका पाकिस्तानी चाहत्यांसाठी पाकिस्तानचा पराभव चांगलाच महागात पडला. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या एका चाहत्याने भारत-पाकिस्तानचा सामना पाहण्याठी थेट शेतातील ट्रॅक्टर विकला आणि सामन्याचे तिकीट खरेदी केले. परंतु पराभव झाल्याने या चाहत्याला चांगलाचं आर्थिक फटका बसला.

पाकिस्तानच्या संघाने टीम इंडियाला ऑलआउट करत ११९ धावांवर रोखले. त्यामुळे पाकिस्तान जिंकेल अशी शक्यता अनेकांनी होती. त्यापैकी ट्रॅक्टर विकून सामना पाहायला आलेल्या चाहत्यालाही भारत पराभूत होईल असं वाटतं होतं. दरम्यान भारत पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी या चाहत्याने $3,000 (भारतीय चलनात 2.5 लाख रुपये) खर्च करून सामन्याचे तिकीट खरेदी केले होतं. तिकीटासाठी या चाहत्याने आपला ट्रॅक्टर विकला होता.

भारत पराभूत होईल, असं त्याला वाटत होतं. त्यामुळे आपण खर्च केलेला पैसा सार्थक झाल्याचं त्याला वाटू लागले. पण बुमराहाच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानी फलंदाजांनी नांगी जेव्हा टाकली तेव्हा या चाहत्याला डोक्याला हात लावण्याची वेळ आली.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना चाहत्याने सांगितले की, 'मी 3000 डॉलरचे तिकीट घेण्यासाठी माझा ट्रॅक्टर विकला. जेव्हा आम्ही भारताची धावसंख्या पाहिली तेव्हा आम्हाला वाटले नव्हते की आम्ही हा सामना गमावू. आम्हाला वाटले की हा सहज विजय होईल. सामना आमच्या हातात होता, पण बाबर आझम बाद झाल्यानंतर लोकांची निराशा झाल्याचं तो म्हणाला. आर्थिक नुकसान झाले असतानाही त्याने भारतीय खेळाडूंचे कौतुक केले.

भारताने ६ धावांनी विजय मिळवला

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली २० षटकांत फक्त ११९ धावा केल्या होत्या. परंतु भारतीय गोलंदाजांनी हे लक्ष्य पाकिस्तानसाठी कठीण केले. पाकिस्तानला २० षटकांत ७ गडी गमावत केवळ ११३ धावा करता आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गुंड निलेश घायवळ याला परदेशातून आणण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

Painkiller Side Effects: तुम्हाला कल्पनाही नसेल इतकी पेनकिलर आरोग्यावर करते परिणाम

Pune Terror Attack : पुण्यात खळबळ! 'I Love Mohammad' नंतर आता 'इस्लाममध्ये संगीत हराम आहे' आशयाचे पोस्टर्स झळकले

Myanmar: म्यानमारमध्ये बौद्ध उत्सवाला लक्ष्य, पॅराग्लायडरद्वारे बॉम्ब टाकले; २४ जणांचा मृत्यू

Kantara Chapter 1: 'हा चित्रपट आणि पात्र...'; ऋषभ शेट्टीने सांगितलं 'या' कारणामुळे 'कांतारा' ब्लॉकबस्टर होऊ शकला

SCROLL FOR NEXT