ODI World Cup In India SAAM TV
Sports

ODI World Cup : शेपूट वाकडंच! वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान खेळणार नाही? PCB च्या ताज्या वक्तव्याने खळबळ

ODI World Cup In India : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून वर्ल्डकपमध्ये खेळण्यासंदर्भात केलेल्या ताज्या वक्तव्याने अवघ्या क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

Nandkumar Joshi

ODI World Cup Latest News : यंदा भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघ सहभागी होणार की नाही, याबाबतचा सस्पेन्स कायम असतानाच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून करण्यात आलेल्या ताज्या वक्तव्याने अवघ्या क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर सर्वकाही आलबेल असल्याचं मानलं जात होतं. पण सवयीप्रमाणे पाकिस्ताननं पुन्हा खोडा घातला आहे, असे बोलले जाते.

आशिया चषक स्पर्धेचे (Asia Cup) वेळापत्रक निश्चित झालं आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानी संघ सहभागी होईल असे वाटत होते. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सहभागाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर सर्व अडचणी दूर झाल्याचे वाटले होते. पाकिस्तान संघही भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळेल, त्यात काहीही अडचण नसेल, असे वाटले होते. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याबाबत वक्तव्य करून सहभागाबाबत प्रश्न निर्माण केले आहेत. (Latest sports updates)

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नझम सेठी यांच्या यासंदर्भातल्या ताज्या विधानाने क्रिकेट विश्वात खळबळ माजवली आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघाने भारतात जाऊन वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी होणे हा सर्वस्वी त्यांच्या सरकारचा निर्णय असेल, असे सेठी म्हणाले. पीसीबी प्रमुखांच्या या वक्तव्याने आयसीसीला पुन्हा एकदा अडचणीत आणले आहे.

पाकिस्तानी संघ वर्ल्डकपसाठी भारतात येणार नाही का?

सेठी म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान संदर्भातील निर्णय पीसीबी किंवा बीसीसीआय करत नाही. हा निर्णय सरकारचा असतो. भारतात जाऊन खेळण्याचा अंतिम निर्णय हा पाकिस्तान सरकारचा असेल. टीम इंडिया पाकिस्तानात जाणार किंवा नाही याबाबत भारत सरकार जसं निर्णय घेतो, त्याचप्रमाणे पाकिस्तानी संघ भारतात जाऊन खेळणार की नाही, हा निर्णय इथलं सरकार घेईल.

३१ ऑगस्टपासून आशिया चषक स्पर्धा

आशिया चषक स्पर्धा ३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. पाकिस्तानमध्ये चार सामने होतील. तर श्रीलंकेत ९ सामने होतील. भारतीय संघ सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Alert in Maharashtra : पाऊस आज कहर करणार, ७ जिल्ह्यांना रेड अलर्ट, IMD च्या इशाऱ्यानंतर २ जिल्ह्यातील शाळा-कॉलेज बंद

Shukrwar che Upay: शुक्रवारच्या 'या' उपायांनी भाग्याचे दरवाजे उघडतील; घरात सुख-समृद्धी सोबत पैसाही येईल

Todays Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींना आज जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी; जाणून घ्या राशीभविष्य

Farmer Protest: बळीराजाचा एल्गार, कर्जमाफीसाठी 'चक्का जाम'; शेतकऱ्यांच्या मरणयातना कधी थांबवणार?

Harshal Patil: हर्षल पाटीलच्या आत्महत्येला सरकार जबाबदार? पाणीपुरवठा मंत्र्यांनी झटकले हात?

SCROLL FOR NEXT