pakistan saam tv
Sports

PCB: चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर PCBचं दिवाळं निघालं! खेळाडूंपेक्षा मजूरांना मिळतेय जास्त सॅलरी

Salary Of Pakistan Cricketers: आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. या स्पर्धेच्या आयोजनानंतर पीसीबीचं दिवाळं निघालं आहे.

Ankush Dhavre

पाकिस्तान क्रिकेट बोर्डला तब्बल २९ वर्षांनंतर आयसीसीच्या स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी मिळाली होती. मात्र या स्पर्धेचे आयोजन करणे,पीसीबीच्या चांगलेच अंगलट आले आहे. प्रॉफीट कमवण्याच्या नादात पीसीबीला मोठा लॉस झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून, पाकिस्तानच्या खेळाडूंच्या मानधनात कपात होणार असल्याची चर्चा सुरु आहे. पण किती कपात होणार? ही किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटूंना आधी २५,००० पाकिस्तानी रुपये म्हणजे ७१ डॉलर्स दिले जायचे. ही मानधनाची रक्कम आता कमी करुन २०,००० पाकिस्तानी रुपये इतकी करण्यात आली आहे. म्हणजे, भारतीय चलनानुसार ही रक्कम केवळ ६००० रुपये इतकीच आहे. मुख्य बाब अशी की, देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचं मानधन हे पाकिस्तानातील मजूरांपेक्षाही कमी आहे.

पीसीबीने जाहीर केलेल्या देशांतर्गत क्रिकेटमधील नव्या कॉन्ट्रॅक्टनुसार, १० कॅप्ट खेळाडू, ६२ उदयोन्मुख खेळाडू, १८ अंडर १९ खेळाडूंचा समावेश आहे. या यादीतील कॅप्ड खेळाडूंमध्ये निदा दार आणि आलिया रियाज यांचा देखील समावेश आहे, ज्यांना सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मिळालेला नाही. पीसीबीने घेतलेल्या या निर्णयाची जोरदार चर्चा झाली, कारण या दोन्ही खेळाडू सातत्याने पाकिस्तान संघासाठी खेळत होत्या.

मुख्य बाब म्हणजे, हा कॉन्ट्रॅक्ट जाहीर करण्यात ९ महिने उशीर झाला आहे. पाकिस्तानात मजूरांना वेतन म्हणून ११४४४ रुपये दिले जातात. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेट खेळणारे खेळाडू श्रेष्ठ की काम करणारे मजूर? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. असं सुरु राहिलं, तर बरेच क्रिकेटपटू क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेऊ शकतात.

पाकिस्तानचा फ्लॉप शो

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. मात्र पाकिस्तानला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. यजमान असून पाकिस्तानला एकही सामना जिंकता आला नव्हता. त्यामुळे पाकिस्तानला साखळी फेरीतून बाहेर पडावं लागलं होतं. पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी स्टेडियमच्या नुतणीकरणासाठी कोट्यावधी रुपये खर्च केला होता. मात्र त्याच मैदानावर पाकिस्तानला केवळ १ सामना खेळण्याची संधी मिळाली. याउलट यजमान असून फायनलचा सामना दुबईत खेळवला गेला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा, राष्ट्रपतींकडून मंजुरी, राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: आंदोलनामध्ये मारहाण करणे चुकीचे असे परत होता कामा नये-अमृता फडणवीस

IVF उपचार घेण्याच्या विचारात आहात? कोणत्या टेस्ट होतात, किती येतो खर्च?

जंतरमंतरच्या स्टेजवरच पोलीस कॉन्स्टेबलचा राजीनामा, VIDEO व्हायरल

कलम 324 च्या आडून तुम्ही मनमानी कराल का? SIR च्या ड्युटीवर शिक्षकांना नेमल्याने हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं

SCROLL FOR NEXT