अवघ्या क्रिकेट जगताला बहारदार फटक्यांनी चकित करणारा अन् वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडेत नाबाद शतकी खेळी करून 'सिकंदर' मीच आहे हे दाखवून देणारा जगज्जेता विराट कोहली यानं आयसीसी वनडे रँकिंगमध्ये नावाप्रमाणेच विराट झेप घेतली आहे. पहिल्या वनडे सामन्यात नाबाद शतक ठोकल्याचा फायदा त्याला रँकिंगमध्ये झालाय. टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल सध्या अव्वल स्थानी आहे. पण त्याच्या सिंहासनाला कोहलीनं थेट आव्हान दिलंय. रेटिंग पॉइंटमध्ये या दोघांमध्ये 'शर्यत' लागली आहे.
आयसीसीने वनडे रँकिंग जाहीर केली आहे. शुभमन गिल पहिल्या स्थानी आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात त्यानं ११० धावांची स्फोटक खेळी केली होती. त्यात १३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. याच शतकी खेळीच्या जोरावर गिलचे रेटिंग पॉइंट वाढून ८१६ वर पोहोचले आहे. २०२३ मध्ये त्याची रेटिंग ८४१ होती. आता तो या रेटिंगच्या अगदी जवळ जाऊन पोहोचला आहे.
टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळलेला विराट कोहली यानं वनडे रँकिंगमध्ये झेप घेत थेट दुसरं स्थान पटकावलं आहे. कोहलीच्या रेटिंगमध्ये वाढ झाली आहे. तो सध्या ७९६ रेटिंगसह दुसऱ्या स्थानी आहे. त्यानं वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत अवघ्या ८८ चेंडूंत १३९ धावांची तुफानी खेळी केली होती. त्यात १० चौकार आणि ९ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. याचाच फायदा त्याला रँकिंगमध्ये झालाय. त्यानं न्यूझीलंडच्या डेरिल मिचेलला मागे टाकलंय. तो आता तिसऱ्या स्थानी आहे. त्याची रेटिंग ७९४ आहे.
भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा हा वनडे रँकिंगमध्ये चौथ्या स्थानी आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. ३५ चेंडूंवर त्यानं ३२ धावा केल्या होत्या. त्यात दोन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. आयसीसी वनडे रँकिंगमध्ये त्याची ७५३ रेटिंग आहे. श्रीलंकेचा कुसल मेंडिस यानंही झेप घेतली आहे. तो सातव्या स्थानी आहे. त्याची रेटिंग ६७४ इतकी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.