team india twitter
Sports

Champions Trophy: ना ऑस्ट्रेलिया, ना दक्षिण आफ्रिका, टीम इंडिया सेमीफायनलमध्ये या संघाविरुद्ध भिडणार

ICC Champions Trophy Semi Final Scenario: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील सेमीफायनलमध्ये जाणारे २ संघ ठरले आहेत. तर उर्वरीत २ संघ अजूनही ठरलेले नाहीत.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. या स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये जाणारे ४ पैकी २ संघ ठरले आहेत. ग्रुप ए मधून भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी सेमीफायनलचं तिकीट मिळवलं आहे. तर ग्रुप बीचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

त्यामुळे कोणते २ संघ सेमीफायनलमध्ये जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना बरोबरीत सुटल्यानंतर, आता ग्रुप बी चं समीकरण बिघडलं आहे. दरम्यान कोणते संघ सेमीफायनलमध्ये जाऊ शकतात? जाणून घ्या.

ऑस्ट्रेलियाला आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना हा सामना जिंकून सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी होती. दोन्ही संघांपैकी जो संघ हा सामना जिंकला असता तो संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करु शकला असता.

मात्र पावसाने हजेरी लावल्यामुळे या सामन्याचा निकाल लागू शकला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला आहे. मात्र आता सामना रद्द झाल्यानंतर सेमीफायनलमध्ये जाण्याचं समीकरण गुंतागुंतीचं झालं आहे. आता इंग्लंडलाही सेमीफायनलमध्ये स्थान मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे.

इंग्लंडकडे सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना बरोरीत सुटल्यानंतर आता दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला गेला आहे. या सामन्यानंतर गुणतालिका पहिली, तर २ पैकी १ सामना जिंकून आणि १ सामना ड्रॉ राहिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ ३ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर त्यांचा नेट रनरेट हा +२.१४० इतका आहे.

तर ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचं झालं, तर हा संघ २ पैकी १ सामना जिंकून आणि १ ड्रॉ होऊन ३ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तर या संघाचा नेट रनरेट +०.४७५ इतका आहे. तिसऱ्या स्थानी असलेल्या इंग्लंडने १ सामना खेळला अजून खातेही उघडता आलेले नाही. अफगाणिस्थानची परिस्थितीही इंग्लंडसारखीच आहे. मात्र या दोन्ही संघांकडे २ चान्स शिल्लक आहेत.

इंग्लंडकडे सेमीफायनलमध्ये जाण्याची नामी संधी चालून आली आहे. इंग्लंडचा पुढील सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर इंग्लंडचा पुढील सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. हा सामना जर जिंकला तर, इंग्लंडचा संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणेकरांना दिलासा! शहरात पाणी कपात नाही

चुका तुमच्या अन् भुर्दंड जनतेला का? PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे कडाडले

EPFO: कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! PF च्या नियमात महत्त्वाचे बदल, थेट तुमच्यावर होणार परिणाम

Famous Actress : लग्नाच्या ४ वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्री घेणार घटस्फोट? नवऱ्याला केले अनफॉलो, लग्नाचे फोटोही Delete

Digital Eye Strain: डोळे जळजळणं किंवा खाज येणं याला थकवा समजू नका; या गंभीर समस्यांचा असू शकतो इशारा

SCROLL FOR NEXT