nitesh rane , sanjay raut, sindhudurg news saam tv
Sports

Nitesh Rane On Narendra Modi Stadium: नरेंद्र माेदी स्टेडियमवर काॅंग्रेसने रचलं हाेते षडयंत्र, नितेश राणेंचा दावा; विराटचा दिला दाखला....

साेनिया गांधी, उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी खासदार संजय राऊत सतत बडबडतात असे राणेंनी म्हटले.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Nitesh Rane :

ज्याने आयुष्यात क्रिकेटची बॅट उचलली नाही ते खासदार संजय राऊत क्रिकेट विषयी आणि विशेष म्हणजे विश्वकरंडकच्या सामन्यावर आणि स्टेडियमवर बाेलत आहे. खरतर महाराष्ट्राच्या राजकारणातील बुकी म्हणजे संजय राऊत होय. बुकीसारखे राजकारणात फिक्सिंग करणे हे त्यांचे काम असल्याची टीका करीत आमदार नितेश राणेंनी राऊत यांना क्रिकेटवर बोलण्याचा अधिकार आहे का ? असा सवाल केला. (Maharashtra News)

नितेश राणे म्हणाले सतत भाजपवर बोलणे ही राऊत यांना सवय झाला आहे. राऊत यांना बाेलण्याचा पगार १० जनपथवर दिला जाताे. मालकाला (उद्धव ठाकरे) खुश करण्यासाठी राऊत सतत बडबडतात असे राणेंनी म्हटले.

ते म्हणाले गुजराथी लाेकांचा इतकाच द्वेष असेल तर तुझ्या मालकाला सांग आधी गुजराथी माणसांशी संबंध ठेवू नकोस. तुझा मालक गुजराथी लोकांवर जगाला, मालकाच्या बांधलेल्या मॉलमध्ये गुजराथी लोक असतात. माेदी स्टेडियममध्ये विश्वकरंडकचे सामने उत्तमरित्या नियाेजन केले. तुम्हांला वर्ल्ड कपच्या मिरच्या का झोंबतात ? असा सवालही राणेंनी राऊतांना केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विराटला भेटणारा पॅलेस्टाईनचा समर्थक

आपल्या भारतात पॅलेस्टाइनचे समर्थन इंडिया अलयांस करते. विराटला ग्राउंडमध्ये भेटायला आलेला पॅलेस्टाईनचा समर्थक आला हाेता. विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यात गालबाेट लावण्यासाठी ताे आला हाेता असा दावा राणेंनी केला. ते म्हणाले पॅलेस्टाइनच्या व्यक्तीचा काॅंग्रेस, खासदार राहूल गांधी यांचा संबंध आहे का याची चाैकशी झाली पाहिजे.

क्रीडा क्षेत्रात राजकीय लॉबी घुसल्याच्या टीकेवर राणे म्हणाले नार्वेकर, राजीव शुक्ला, शरद पवार हे देखील क्रिकेटमध्ये हाेते आणि आहेत ना. फुटबाॅलमध्ये आदित्य ठाकरे आहेत हे तुम्हांला चालते का असा सवालही राणेंनी केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT