Tim Southee Test Retirement SAAM TV
Sports

Tim Southee: टीम साऊदीचा टेस्ट क्रिकेटला रामराम; WTC आधीच न्यूझीलंडची 'कसोटी' लागणार

Tim Southee Test Retirement: न्यूझीलंडचा माजी टेस्ट कॅप्टन आणि वेगवान गोलंदाज टीम साऊदीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीये. टीम साऊदी न्यूझीलंडसाठी दुसरा सर्वाधिक टेस्ट विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.

Surabhi Jayashree Jagdish

नुकतंच न्यूझीलंडने टीम इंडियाला 3-0 असा व्हाईटवॉश दिला. दरम्यान या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडने झेप घेतली. WTC ची फायनल गाठणं न्यूझीलंडसाठी काहीसं सोप असतानाच किवींच्या सर्वोत्तम आणि वरिष्ठ गोलंदाजाने निवृत्ती जाहीर केली आहे

न्यूझीलंडचा माजी टेस्ट कॅप्टन आणि वेगवान गोलंदाज टीम साऊदीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीये. टीम साऊदी न्यूझीलंडसाठी दुसरा सर्वाधिक टेस्ट विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. २८ नोव्हेंबरनंतर सुरू होणाऱ्या ३ सामन्यांच्या टेस्ट सिरीजनंतर तो क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. १४ ने १८ डिसेंबरदरम्यान होणारा सिरीजमधील अंतिम सामना टीम साऊदीचा शेवटचा टेस्ट सामना ठरणार आहे.

टीम साऊदीने मार्च 2008 मध्ये इंग्लंडविरुद्ध टेस्ट डेब्यू केला होता. आतापर्यंत त्याने प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये 104 सामने खेळले असून 385 विकेट्स घेतल्यात. न्यूझीलंडकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या पुढे रिचर्ड हॅडली (३८५) आहे. त्याने न्यूझीलंडकडून 161 वनडे आणि 126 टी-20 सामने खेळले असून, त्याने अनुक्रमे 221 आणि 164 विकेट्स घेतल्या आहेत.

काय म्हणाला साऊदी?

सौदी म्हणाला, “टेस्ट क्रिकेटला माझ्या हृदयात विशेष स्थान आहे. इंग्लंडविरुद्ध एवढी मोठी सिरीज खेळल्यानंतर निवृत्ती घेणं हा सर्वोत्तम वेळ आहे. माझ्या टेस्ट कारकिर्दीला इंग्लंडविरुद्ध सुरुवात झाली. तिन्ही मैदानं माझ्यासाठी खूप खास आहेत. माझे कुटुंब, मित्र, प्रशिक्षक, आमचे चाहते आणि या खेळाशी निगडित प्रत्येकाचा मी सदैव ऋणी राहीन. माझ्यासाठी हा खूप सुंदर प्रवास होता आणि तो तसाच राहील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिस नायकवडी यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून माघार

Mangalsutra Designs: महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न, ५ डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये

Gold Price Today: जळगावच्या सुवर्ण बाजारासाठी दसरा ठरला निरस; सोन्याचे भाव घसरूनही उलाढालीत १५ टक्क्यांची घट; आजचे दर किती?

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

Carpet Cleaning : घाणेरडे कार्पेट स्वच्छ करण्यासाठी एकही रुपया खर्च नको! घरच्या घरी ड्राय क्लीनिंग करण्याच्या 3 सोप्या स्टेप्स

SCROLL FOR NEXT