Netharland vs UAE, T20 world cup 2022 saam tv
क्रीडा

T20 World Cup : नेदरलॅंडचं वर्ल्डकपमध्ये टेक ऑफ, अटीतटीच्या सामन्यात यूएईचा केला पराभव

. नेदरलॅंडचा कर्णधार स्कॉट एडवर्डने शेवटच्या स्पेलमध्ये 16 धावांची नाबाद खेळी केली, अन्...

नरेश शेंडे

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात आजपासून टी-20 वर्ल्डकपची रणधुमाळी सुरू झाली असून नामेबियानं आशिया कप विजेत्या श्रीलंकेला पहिल्याच सामन्यात 55 धावांनी पराभूत केलं. दरम्यान, आयसीसी टूर्नामेंटमधील 'ग्रूप ए'चा दुसरा सामना यूएई आणि नेदरलॅंड यांच्यात सायमंड स्टेडिअममध्ये रंगला. यूएईने नेदरलॅंडला 112 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करत नेदरलॅंडने तीन विकेट्स राखून यूएई संघाचा पराभव केला. नेदरलॅंडचा कर्णधार स्कॉट एडवर्डने शेवटच्या स्पेलमध्ये 16 धावांची नाबाद खेळी करून नेदरलॅंडला विजय मिळवून दिला. (Netherland won against UAE in T20 World Cup 2022)

यूएईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरेल्या यूएईला नेदरलॅंड संघापुढ तगडं आव्हान ठेवतं आलं नाही. यूएईने 20 षटकात 8 विकेट्स गमावत 111 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी नेदरलॅंडच्या फलंदाजांनी कंबर कसली. नेदरलॅंडचे सलामीवीर फलंदाज विक्रमजीत सिंग आणि मॅक्सने 33 धावांची खेळी साकारली. मॅक्सने 18 चेंडूत 23 धावा केल्या.

यूएई आणि नेदरलॅंड यांच्यात झालेल्या सामन्यात यूएईने नेदरलॅंडला 112 धावांचं आव्हान दिलं होत. यूएईचे सलामीवीर फलंदाज चिराग सुरी आणि मुहम्मद नसीमने 53 धावंची खेळी साकारली. मुहम्मदन 41 धावांवर खेळत असताना फ्रेड क्लासनेच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर चिरागला धावांचा सूर न गवसल्याने तो अवघ्या 12 धावांवर तंबूत परतला.

नेदरलॅंडच्या गोलंदाजांनी भेदक मारा केल्यामुळं यूएईच्या फलंदाजांना मैदानात धावांचा पाऊस पाडता आला नाही. फ्रेड क्लासेन आणि बास दी लिडे या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. लिडेनं तीन विकेट्स तर क्लासेनला दोन विकेट्स मिळाल्या. तर युएईचा गोलंदाज जुनैद सिद्दीकीने खोचक गोलंदाजी करत नेदरलॅंड संघाच्या तीन फलंदाजांना बाद केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT