Naveen Ul Haq Retirement:  Saam tv
Sports

Naveen Ul Haq Retirement: विराटला नडणाऱ्या खेळाडूचा वनडे क्रिकेटला गुड बाय; वयाच्या २४ व्या वर्षी केली निवृत्तीची घोषणा

Naveen Ul Haq Retirement: अफगाणिस्तानचा युवा क्रिकेटर नवीन-उल-हकने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Vishal Gangurde

Naveen Ul Haq Retirement:

अफगाणिस्तानचा युवा क्रिकेटर नवीन-उल-हकने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. नवीनने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना विश्वचषक २०२३ नंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची माहिती दिली. नवीनने २४ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केल्यानं क्रिकेट चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

नवीन उल हकने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे, त्यामुळे आता नवीन आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात खेळताना दिसणार आहे. नवीन हा आयपीएल २०२३ मधील एका सामन्यात विराट कोहलीशी पंगा घेतल्याने चर्चेत आला होता. दरम्यान, नवीनने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत शेअर निवृत्तीची माहिती दिली आहे.

नवीनने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ' माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करणं माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मी विश्वचषकानंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. मात्र, देशासाठी टी-२० फॉर्मेटमध्ये क्रिकेट खेळत राहणार आहे. माझ्यासाठी हा निर्णय अवघड होता. परंतु मला चांगल्या क्रिकेट करिअरसाठी हा निर्णय घ्यावा लागला. मी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा आभारी आहे. तसेच सर्व चाहत्यांचे आभार मानतो'.

तत्पूर्वी, नवीन हा फक्त २४ वर्षांचा आहे. नवीनने अफगाणिस्तानसाठी ७ वनडे सामने खेळले आहेत. त्याने सर्व सात सामन्यात १४ गडी बाद केले आहेत. त्याने एका वनडे सामन्यात ४२ धावा देऊन ४ गडी बाद केले होते. त्याचबरोबर त्याने २७ टी-२० सामन्यात ३४ गडी बाद केले आहेत. तर आठ आयपीएल सामन्यात ११ गडी बाद केले आहेत. नवीनने लखनऊ सुपर जायंट्ससोबत खेळताना विराट कोहलीशी पंगा घेतला होता. त्यावेळी नवीन खूपच चर्चेत आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT