National Sports Day  Saam Tv
Sports

National Sports Day : क्रीडा दिन का साजरा केला जातो ? आजच्या दिवशी पहा गाजलेले खेळाडूंचे 'हे' बायोपिक !

भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती या दिवशी असल्याने हा दिवस साजरा करण्यात येतो.

कोमल दामुद्रे

National Sports Day : राष्ट्रीय क्रीडा दिन हा विविध देशांमध्ये राष्ट्रीय क्रीडा संघ आणि त्या देशांच्या क्रीडा परंपरांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी हा साजरा केला जातो. भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती या दिवशी असल्याने हा दिवस साजरा करण्यात येतो.

हा दिवस १९२८, १९३२ आणि १९३६ मध्ये भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारे हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस आजच्या दिवशी असतो त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय क्रिडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे भारतीय आणि जागतिक हॉकीमधील एक महान व्यक्तिमत्त्व होते.

राष्ट्रीय खेळ म्हणून भारतात हॉकीला संबोधले जाते. परंतु, खेळ खेळण्यासाठी सगळेच दिवस हे विशेष आहे. हल्ली जगभरात खेळासाठी क्रिकेटप्रेमी अतिउत्साही असतात. कालच्या आशिया चषक २०२२ मध्ये भारत (India) विरुध्द पाकिस्तान असा सामना रंगला होतो ज्यात भारताने ५ गडी राखून हा सामना जिंकलेला आहे. त्यामुळे भारतातील क्रिकेटप्रेमींनी (Cricket) आपल्या लाडक्या खेळांडूवर त्यांच्या प्रेमांचा वर्षावही केलेला दिसून आला.

त्यातच आजच राष्ट्रीय क्रीडा दिन असल्यामुळे आजचा दिवस प्रत्येक खेळाडूप्रेमींसाठी खास असेल. बॉलीवूडमधील चित्रपट हे प्रत्येक शैलीचे चित्रपट आपल्या प्रेषकांसमोर मांडत असतात. क्रीडा चित्रपट हे महाकाव्याचे दुसरे स्तर आहेत. राष्ट्रीय क्रीडा दिन २०२२ च्या निमित्ताने, आपण विविध क्रीडा व्यक्तिमत्त्वांच्या प्रवासाचा मागोवा घेणार्‍या सर्वोत्कृष्ट पाच बॉलिवूड चित्रपटांची यादी तयार केली आहे. यामुळे अनेक क्रीडाप्रेमींना खेळ्यास उत्साह मिळेल.

83

१. 83 या रणवीर सिंगच्या मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटात दीपिका पदुकोण, जिवा, पंकज त्रिपाठी अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. आदिनाथ कोठारे, धैर्य करवा आणि आर. बद्री. कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघावर आधारित, ज्याने १९८३ क्रिकेटचा विश्वचषक जिंकला. ज्यामुळे क्रिकेटप्रेमींना खेळण्याची नवीन उम्मीद जागी होते.

Dangal

२. दंगलमध्ये आमिर खानसोबत फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, जायरा वसीम, सुहानी भटनागर आणि साक्षी तन्वर आहेत. हे भारतीय हौशी कुस्तीपटू आणि वरिष्ठ ऑलिम्पिक प्रशिक्षक महावीर सिंग फोगट यांच्या बायोपिकवर आधारित आहे, ज्यांनी त्यांच्या मुली बबिता कुमारी आणि गीता फोगट यांना कुस्ती शिकवली. हा चित्रपट मुलींदेखील कुस्ती खेळू शकतात व त्यांचे त्यांच्या खेळाप्रति असणारे प्रेम यात दिसून येते.

Mary Kom

३. मेरी कोमच्या खेळाडू जीवनावर प्रियांका चोप्रासोबत या चित्रपटात दर्शन कुमार आणि सुनील थापा यांच्याही भूमिका आहेत. २०१४ च्या बायोपिकमध्ये तिचा बॉक्सर बनण्याचा प्रवास आणि आई बनल्यानंतर २००८ च्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकून खेळात परतण्याचा इतिहास आहे यात दर्शविला आहे. या चित्रपटातून अनेक प्रेरणा मिळतात.

M.S. Dhoni: The Untold Story

४. हा चित्रपट भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचे माजी कसोटी, एकदिवसीय आणि T20I कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या जीवनावर आधारित आहे. ज्यांनी प्रतिकूल परिस्थिती असूनही आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणे सोडले नाही. या चित्रपटात दिवंगत सुशांत सिंग राजपूत धोनी, दिशा पटानी, कियारा अडवाणी आणि अनुपम खेर यांच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट अनेक क्रिकेटप्रेमींच्या मनाचा ठाव घेतो.

Bhaag Milkha Bhaag

५. भाग मिल्खा भाग ही कथा 'द फ्लाइंग सिख' या ऑलिम्पिकच्या जीवनावर आधारित आहे, जो राष्ट्रकुल खेळांचा चॅम्पियन होता आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन वेळा ४०० मीटरचा चॅम्पियन ठरलेला मिल्खा सिंग ज्याने आपल्या कुटुंबाच्या नरसंहारावर आणि भारतातील गृहयुद्धावर मात केली होती. आर्ट मलिक आणि प्रकाश राज यांच्या प्रमुख भूमिकेत फरहान अख्तर दिसला असून अनेक धावपट्टूंना याविषयी प्रेरणा मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकच्या निफाड तालुक्यातील गावांना पावसाचा फटका

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT