Harshvardhan Sadgir celebrates after winning the Maharashtra Kesari title in Pune. saam tv
Sports

Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी, फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान

Harshawardhan Sadgir Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीर हा 68 वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. हर्षवर्धन सदगीर दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकणारा सातवा कुस्तीपटू ठरला आहे.

Bharat Jadhav

  • हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरी

  • महेंद्र गायकवाडचा अंतिम फेरीत पराभव

  • दुसऱ्यांदा जिंकली मानाची गदा

पुण्यातील वाघोलीत झालेल्या 68 वा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राज्याला नवा महाराष्ट्र केसरी मिळाला आहे. नाशिकचा हर्षवर्धन सदगीरनं 68 वं महाराष्ट्र केसरीची गदा जिंकलीय. पुण्यातील वाघोलीत झालेल्या अंतिम सामन्यात हर्षवर्धन सदगीरने सोलापुरच्या महेंद्र गायकवाडला चीतपट करत मानाची चांदीची गदा पटकावली आहे. हर्षवर्धनने 4-2 अशा फरकाने विजय मिळवला. यासह हर्षवर्धनची महाराष्ट्र केसरी गदा पटकावण्याची ही एकूण दुसरी वेळ आहे.

वाघोली येथे पार पडलेल्या 68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावणारा थरार अनुभवायला मिळाला. गादी विभागातील विजेता हर्षवर्धन सदगीर आणि माती विभागातील विजेता महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात हर्षवर्धन सदगीर यांनी दमदार खेळ करत मानाची महाराष्ट्र केसरी गदा पटकावली. अंतिम सामन्यातील हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड यांची झुंज ही खऱ्या अर्थाने कुस्ती परंपरेची मान उंचावणारी ठरली

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात सामना झाला. अंतिम लढतीत हर्षवर्धन सदगीर याने महेंद्र गायकवाडला 4-2 असे पराभूत केलं. या विजयासह हर्षवर्धन सदगीर सातवा डबल महाराष्ट्र केसरी ठरला. महाराष्ट्र केसरीच्या किताबासह हर्षवर्धन सदगीरने मानाच्या गदासह फॉर्च्यूनर कार जिंकली आहे. फॉर्च्यूनर कार जिंकणारा तो पहिला महाराष्ट्र केसरी ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मी अवतारी, तू मागील जन्माची अप्सरा'; लग्नाचं आमिष दाखवत महिलेचं लैंगिक शोषण; अशोक खरातविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून दोन भाविकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण

लांडगा-कुत्र्याचं मिलन धोकादायक, संकरातून हिंस्त्र पिल्लांचा जन्म, महिलेवरच्या हल्ल्यानंतर वनविभागाला जाग?

महाराष्ट्रातील भाजपचा अनुभवी चेहरा हरपला! देशाच्या राजकारणात हळहळ

भोंदू खरातचा पाय आणखी खोलात, SIT पाठोपाठ आयकरच्याही रडारवर?

SCROLL FOR NEXT