naseem shah crying twitter
Sports

IND vs PAK: पाकिस्तानच्या पराभवानंतर नसीम शाहला अश्रू अनावर! ढसाढसा रडतानाचा Video व्हायरल

Naseem Shah Crying Viral Video: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या पराभवानंतर नसीम शाह ढसाढसा रडला.

Ankush Dhavre

भारत-पाकिस्तान सामन्याची कोट्यवधी क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. हे दोन्ही संघ द्विपक्षीय मालिका खेळत नाही. त्यामुळे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमनेसामने येत असतात. दोन्ही संघांमध्ये होणारा सामना हा क्रिकेटमधील महायुद्धापेक्षा कमी नसतो. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडू जिंकण्यासाठी पूर्ण जोर लावतात.

न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवरही असाच काहीसा सामना पाहायला मिळाला. या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान या सामन्यातील पराभवानंतर नसीम शाहला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह जेव्हा फलंदाजीला आला, त्यावेळी त्याला ३ चेंडूत १६ धावा करायच्या होत्या. जे त्याच्यासाठी जवळजवळ कठीण होतं. त्याने सलग २ चेंडूंमध्ये २ चौकार मारले. मात्र शेवटच्या चेंडूवर भारतीय संघाचा विजय निश्चित झाला होता. शेवटच्या चेंडूवर ८ धावांची गरज असताना अर्शदीप सिंगने यॉर्कर टाकला आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान पराभूत झाल्यानंतर मैदानाबाहेर जात असताना नसीम शाह रडताना दिसून आला आहे. शाहीन शाह आफ्रिदी त्याचे अश्रू पुसून त्याला धीर देताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नसीम शाहची शानदार गोलंदाजी

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय सार्थ ठरवत पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांच्या अडचणी वाढवत संपूर्ण डाव अवघ्या ११९ धावांवर संपुष्ठात आणला.

पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना नसीम शाहने ४ षटकात ५.२५ च्या इकोनॉमीने २१ धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याने ३ भारतीय फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Heart attack risk: दररोजच्या या ५ सवयी तुमच्या हृदयाला पाडतायत आजारी; डॉक्टरांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

SCROLL FOR NEXT