bcci Saam TV
Sports

IPL 2022 फायनलमध्ये असं काही घडलं की थेट गिनीज बूकमध्ये नोंद; जय शाहांनी केलं ट्वीट

29 मे 2022 रोजी IPL फायनल दरम्यान स्टेडियममध्ये 101,566 प्रेक्षक होते.

साम टिव्ही ब्युरो

Cricket News : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. 2022 च्या आयपीएल फायनलमध्ये सर्वाधिक प्रेक्षक उपस्थित असल्याने या स्टेडियमला ​​हा किताब देण्यात आला आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियम आधी गुजरात क्रिकेट असोसिएशन (GCA) स्टेडियम मोटेरा म्हणून ओळखले जात होते. त्याची क्षमता 110,000 प्रेक्षकांची आहे. तर मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) पेक्षा ही क्षमता अंदाजे 10,000 जास्त आहे. MCG ची क्षमता 100,024 प्रेक्षकांची आहे. (Sports News)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी रविवारी ट्वीट करुन सांगितलं की, 'नरेंद्र मोदी स्टेडियमचा गिनीज बुक रेकॉर्डमध्ये समावेश झाला आहे. टी-20 सामन्यात सर्वाधिक प्रेक्षक संख्येसाठी हा रेकॉर्ड झाला आहे. या गोष्टीचा मला अभिमान आणि आनंद आहे. 29 मे 2022 रोजी IPL फायनल दरम्यान स्टेडियममध्ये 101,566 प्रेक्षक होते. हे शक्य केल्याबद्दल प्रेक्षकांच्या समर्थनामुळे शक्य झालं, खूप खूप आभार.

आयपीएल 2022चा अंतिम सामना 29 मे रोजी गुजरात आणि राजस्थान यांच्यामध्ये झाला होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये हा फायनल सामना झाला होता. या सामन्यात गुजरातने सात विकेट्सनं विजय मिळवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अकोला-खंडवा रेल्वेमार्गामुळे खरीप बुडाला; रेल्वेच्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त

Pune News: बांधकाम व्यावसायिक आत्महत्या प्रकरण; शिंदे गटातील बडा नेता आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल

दैनिक राशिभविष्य... मेष, कर्क ते वृश्चिक, मीन...१२ राशींसाठी कसा असेल शुक्रवार? तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनात उद्धव ठाकरे, २० जुलैला दिल्लीत जाणार, VIDEO

Mira Road Accident: मुंबईमधील बांधकाम साईटवर भीषण अपघात; ११ व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, अनेक वाहनांचा चुराडा

SCROLL FOR NEXT