Musheer Khan saam digital
क्रीडा

Musheer Khan: मुशीरचा डबल धमाका! मास्टर ब्लास्टरचा रेकॉर्ड मोडला; मोठ्या रेकॉर्डमध्ये राहुल- अय्यरलाही सोडलं मागे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Musheer Broke Sachin Tendulkar Record

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रणजी ट्रॉफी २०२४ स्पर्धेच्या फायनलचा सामना पार पडला. या स्पर्धेतील फायनलमध्ये मुंबई आणि विदर्भ हे दोन्ही संघ आमने- सामने आले होते. या सामन्यात मुंबईने बाजी मारत विदर्भावर १६९ धावांनी विजय मिळवला. हा सामना गाजवला तो मुंबईचा युवा शिलेदार मुशीर खानने. या सामन्यात फलंदाजी करताना त्याने सचिन तेंडुलकरचा मोठा रेकॉर्ड मोडण्यासह आणखी २ रेकॉर्ड मोडून काढले आहेत.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्लेअर ऑफ द मॅच....

सरफरान खानने नुकताच भारतीय संघासाठी पदार्पण केलं. पदार्पणातच त्याने शानदार खेळ करुन दाखवला. तर दुसरीकडे त्याचा धाकटा भाऊ मुशीरने रणजी ट्रॉफीत हवा केली. १९ वर्षीय मुशीरने रणजी फायनलमध्ये शतक झळकावत सचिन तेंडुलकरकचा २९ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडून काढला. त्याने फायनलमध्ये १३६ धावांची झुंजार खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याला सामनावीर पुरस्कार पटकावला. यासह तो रणजी फायनलमध्ये सामनावीर पुरस्कार पटकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. या रेकॉर्डमध्ये त्याने श्रेयस अय्यर आणि केएल राहुलला मागे सोडलं आहे.

रणजी ट्रॉफी फायनलमध्ये वयाच्या १९ व्या वर्षी सामनावीर पुरस्कार पटकावणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी वयाच्या २१ व्या वर्षी हा कारनामा केला होता. मुशीर खान आयसीसी अंडर १९ वनडे वर्ल्डकप २०२४ स्पर्धा खेळून संघासोबत जोडला गेला. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्याने रणजी ट्रॉफीत धुमाकूळ घातला आहे. फायनलमध्ये त्याने १३६ धावांची खेळी केली. विशेष म्हणजे तो या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. ऐवढेच नाही तर त्याने गोलंदाजी करताना विदर्भ संघाच्या दोन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले.

मुंबईने ४२ वे रणजी विजेतेपद पटकावले.......

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने २०२३-२४ वर्षांतील रणजी ट्रॉफी स्पर्धा जिंकली आहे. हे मुंबईचे ४२ वे जेतेपद ठरले आहे. मुंबईने ८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. या सामन्यात विदर्भाला विजयासाठी ५३८ धावांचे आव्हान होते. या धावांचा पाठलाग करताना विदर्भाकडून कर्णधार अक्षय वाडकरने शतकी खेळी केली. मात्र त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. मुंबईच्या धारदार गोलंदाजीपुढे विदर्भाचा संपूर्ण डाव ३६८ वर आटोपला. यासह मुंबईने हा सामना १६९ धावांनी जिंकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT