आयपीएल २०२६ चं मिनी ऑक्शन अबुधाबीमध्ये सुरु आहे. या ऑक्शनच्या सुरुवातीलाच पृथ्वी शॉवर बोली लागेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र पहिल्या सेशनमध्ये पृथ्वी शॉ अनसोल्ड राहिलाय. ७५ लाखांच्या बेस प्राईसवर पृथ्वी शॉ ऑक्शनमध्ये उतरला होता. मात्र कोणत्याही टीमने त्याच्यावर बोली लावली नाही.
२०२५ साली झालेल्या मेगा ऑक्शनमध्येही पृथ्वी शॉ अनसोल्ड राहिला होता. त्यानंतर आता देशांतर्गत मुंबई टीममधून देखील ड्रॉप करण्यात आलं होतं. सध्या सय्यैद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने ७ डावांमध्ये 160.52 च्या स्टाईक रेटने 183 रन्स केले होते. त्यामुळे आजच्या मिनी ऑक्शनमध्ये त्याच्यावर नजर होती मात्र तो अनसोल्ड राहिलाय.
आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये सरफराज खानही अनसोल्ड राहिलाय. सरफराज खानची बेस प्राईज ७५ लाख रूपये होती. मात्र या ऑक्शनमध्ये कोणीही या खेळाडूवर बोली लावली नाही.
नुकतंच फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सरफराजने उत्तम कामगिरी केली होती. सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने राजस्थानविरूद्ध तुफानी इनिंग खेळली होती. यावेळी त्याने २२ चेंडूंमध्ये ७३ रन्सची खेळी केली होती. त्याने 331.82 च्या स्टाईक रेटने ७ सिक्स ६ फोर लगावले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.