Rohit sharma  Saam Tv
Sports

Mumbai Indians Record of Every First Match: दिलदार मुंबईकर! तब्बल 'इतक्यांदा' दिली पहिली मॅच देवाला..

Mumbai Indians Record In Opening Match: या सामन्यात पराभूत होताच मुंबई इंडियन्स संघाच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

Ankush Dhavre

Mumbai Indians IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील पाचव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. एम चिन्नावामी स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जोरदार कामगिरी करत या सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला आहे. दरम्यान या सामन्यात पराभूत होताच मुंबई इंडियन्स संघाच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीखेळणारा मुंबई इंडियन्स संघ हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने पाच वेळेस जेतेपदाला गवसणी घातली आहे. मात्र पहिल्या सामन्यात पराभूत होताच मुंबईच्या नावे एका नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे.

मुंबई इंडियन्स संघाने तब्बल ११ व्या वेळेस आयपीएल स्पर्धा खेळताना पहिला सामना गमावला आहे. असा कारनामा करणारा मुंबईन इंडियन्स हा एकमेव संघ आहे.

मुंबई इंडियन्स संघाने २०१२ मध्ये पहिला सामना जिंकला होता.त्यानंतर सलग ११ हंगामांमध्ये मुंबई इंडियन्स संघाला परभावाचा सामना करावा लागला आहे. (Latest sports updates)

पहिल्याच सामन्यात सलग ११ वेळेस पराभूत..

२०१३ - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून पराभूत

२०१४ - कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून पराभूत

२०१५ - कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून पराभूत

२०१६ - रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून पराभूत

२०१७ - रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून पराभूत

२०१८- चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून पराभूत

२०१९ - दिल्ली कॅपिटल्स संघाकडून पराभूत

२०२०- चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून पराभूत

२०२१- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून पराभूत

२०२२- दिल्ली कॅपिटल्स संघाकडून पराभूत

२०२३ - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून पराभूत

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अप्रतिम गोलंदाजी केली.

मुंबईला या डावात १७२ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसीसने चांगली सुरुवात केली. दोघांनी १४८ धावांची भागीदारी केली. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ८ गडी राखून जिंकला. (Latest sports updates)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

Vastu Tips For Wall Clock: घरात घड्याळ कुठे लावावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Stylish Tops For Women: जीन्सवर कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावेत? पाहा लेटेस्ट कलेक्शन

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT