भारतीय युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असूनही तो कायदेशीर प्रकरणात अडकला आहे. इन्फ्लुएंसर विनयभंग प्रकरणात मुंबई कोर्टाने क्रिकेटपटूला १०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. सोशल मीडिया इन्फुएंसर सपना गिलने दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर दाखल न केल्याबद्दल मुंबई दिंडोशी सत्र न्यायालयाने ही कारवाई केली. न्यायालयाने पृथ्वी शॉला उत्तर दाखल करण्याची शेवटची संधी दिली होती, परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. इन्फुएसंर सपना गिलने पृथ्वी शॉवर विनयभंग आणि मारहाणीचे गंभीर आरोप केले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
हे प्रकरण फेब्रुवारी २०२३ चे आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी परिसरातील एका पबमध्ये भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्यात वाद झाला होता. सपना गिलचा मित्र शोभित ठाकूर रात्री उशिरा पृथ्वी शॉकडून वारंवार सेल्फीची मागणी करत होता. सुरुवातीला शॉने फोटो काढण्यासाठी पोज दिली, परंतु वारंवार नकार दिल्यानंतर वाद वाढला आणि फोन हिसकावून फेकून दिला. यानंतर, जेव्हा सपना गिलने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा शॉ आणि त्याच्या मित्रांनी तिचा विनयभंग करत मारहाण केली.असे आरोप सपना गिलने केले आहेत. तर पृथ्वी शॉनेही सपना गिल विरोधात आरोप केले आहेत की, सपना गिलसह ६ जणांनी पृथ्वी शॉच्या मित्राचा पाठलाग केला आणि ५०,००० रुपयांची मागणी केली. नंतर, पोलिसांनी गुन्हा दाखल करत १७ फेब्रुवारी रोजी सपना गिलला अटक केली, त्यानंतर तीन दिवसांनी तिला जामीन मिळाला.
कोर्टाने पृथ्वी शॉला का दंड ठोठावला ?
संपूर्ण घटनेनंतर, सपनाने पोलिसांकडे एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही. त्यानंतर तिने अंधेरी येथील मॅजिस्ट्रेट कोर्टात याचिका दाखल केली. एप्रिल २०२४ मध्ये मॅजिस्ट्रेट कोर्टाने एफआयआर दाखल करण्यास विलंब झाल्याचे मान्य करत प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. वृत्तानुसार, दिंडोशी सत्र न्यायालयाने सपना गिलच्या आरोपावर पृथ्वी शॉला वारंवार उत्तर दाखल करण्यास सांगण्यात आले.परंतु. ९ सप्टेंबर २०२५ पर्यंत वारंवार सांगूनही उत्तर दाखल होत नसल्याचे कोर्टाने नमूद केले. यानंतर कारवाई करण्यात आली.
सपना गिलच्या वकिलाने काय म्हटले?
सपना गिलचे वकील अली काशिफ खान देशमुख म्हणाले की, "मुंबईच्या दिंडोशी सत्र न्यायालयाने भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉला १०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सपना गिलने दाखल केलेल्या फौजदारी पुनर्विलोकन याचिकेत वारंवार उत्तर न दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. देशमुख पुढे म्हणाले की, न्यायालयाने या प्रकरणात कडक भूमिका घेत सांगितले की, शॉ यांना अनेक वेळा समन्स बजावण्यात आले होते आणि त्यांचे वकीलही अनेक तारखांना न्यायालयात उपस्थित होते, तरीही अद्याप उत्तर दाखल केलेले नाही आणि फक्त वेळ मागितली जात आहे. आता, या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.