MS Dhoni Health Update
MS Dhoni Health Update saam tv
क्रीडा | IPL

MS Dhoni Health Update: मोठी बातमी! धोनी रुग्णालयात दाखल होणार; चाहत्यांची चिंता वाढली

Chandrakant Jagtap

Dhoni will admitted to hospital for knee injury treatment : आयपीएलचं विजेतेपद पटकावल्यानंतर आनंदाने गदगदून गेलेल्या धोनीच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. या हंगामात दुखापतीमुळे त्रस्त असलेला चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी रुग्णालायात दाखल होण्याची शक्यता आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे एमएस धोनीला रुग्णालयात दाखल केले जाऊ शकते. त्याच्यावर काही चाचण्या केल्या जाणार असून कोकिलाबेन रुग्णालयात धोनी दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.

महेंद्रसिह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने सोमवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल फायनलमध्ये गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव केला. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेचे हे पाचवे आयपीएल विजेतेपद आहे. यासह चेन्नईने आयपीएलमध्ये सर्वाधिक ट्रॉफी जिंकण्याच्या बाबतीत मुंबई इंडियन्सची बरोबरी केली आहे.

या आठवड्याच्या शेवटी दाखल होणार?

विशेष म्हणजेच आयपीएलचा अंतिम सामना जिंकल्यानंतर चेन्नई संघ सेलिब्रेशन करत असताना धोनीच्या गुडघ्याला पट्टा बांधलेला दिसत होता. त्यामुळे चाहत्यांची काळजी वाढली होती. त्यांनंतर आता त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार या गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेला धोनी लवकरच उपचारासाठी रुग्णालायत दाखल होण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या अखेरीस कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल दाखल केले जाऊ शकते. तिथे धोनीच्या गुडघ्याबाबत काही चाचण्या होऊ शकतात. (Latest Sports News)

निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य

अंतिम सामना जिकंल्यानंतर धोनीने निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य केले. “माझी निवृत्ती जाहीर करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. मला जेवढे प्रेम मिळाले आहे, इथून निघून जाणं ही सोपी गोष्ट आहे, पण त्याहून (Cricket News) कठीण गोष्ट म्हणजे 9 महिने मेहनत करून पुन्हा आयपीएल खेळण्याचा प्रयत्न करणं. हे माझ्याकडून एक भेट असेल, शरीरासाठी ते सोपं होणार नाही” अशी धोनीने प्रतिक्रिया दिली. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

SCROLL FOR NEXT