mohammed siraj catch video  saam tv
Sports

Mohammed Siraj Catch Video: डेरिंगबाज सिराज! हवेत उडून टिपला भन्नाट कॅच; खाली आपटताच संघाने घेतली धाव,पाहा VIDEO

Match Winning Catch Video:अफलातून झेल टिपणारा मोहम्मद सिराज या सामन्यात जोरदार चर्चेत राहिला आहे.

Ankush Dhavre

IND VS WI 1st Test: भारत विरुद्ध वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये डॉमिनिकाच्या मैदानावर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्या वेस्टइंडीजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला आहे.

वेस्टइंडीजचा पहिला डाव अवघ्या १५० धावांवर संपुष्टात आला आहे. या डावात आर अश्विनने ५ गडी बाद केले. दरम्यान अफलातून झेल टिपणारा मोहम्मद सिराज या सामन्यात जोरदार चर्चेत राहिला आहे.

वेस्टइंडीज संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्टइंडीज संघाकडून ब्लॅकवुड हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याने या डावात ३४ चेंडूंचा सामना करत १४ धावांची खेळी केली.

दरम्यान रविंद्र जडेजा गोलंदाजी करत असताना, ब्लॅकवुडने मिड ऑफच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला. कारण मिडऑफला क्षेत्ररक्षण करत असलेल्या मोहम्मद सिराजने डाइव्ह मारत एकहाती झेल टिपला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. (Latest sports updates)

सिराजने जेव्हा हा झेल टिपण्यासाठी उजव्या बाजूला डाइव्ह मारली आणि एका हाताने पक्ष्यासारखा झेपावत झेल टिपला. हा झेल टिपण्याच्या नादात तो गंभीर दुखापतग्रस्त झाला असता.

मात्र त्याने दुखापतीची पर्वा न करता संघासाठी आपलं १०० टक्के देण्याचा विचार केला. या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मोहम्मद सिराजवर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.

भारतीय संघाची दमदार सुरूवात..

या सामन्यात वेस्टइंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात वेस्टइंडीजचा पहिला डाव अवघ्या १५० धावांवर संपुष्टात आला. भारतीय संघाकडून आर अश्विनने सर्वाधिक ५ गडी बाद केले.

तर भारतीय संघाकडून फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कर्णधार रोहित शर्मा आणि पदार्पणवीर यशस्वी जयस्वालने संघाला चांगली सुरूवात करून दिली. यशस्वी जयस्वाल ४० तर कर्णधार रोहित शर्मा ३० धावांवर नाबाद आहे. दोघांनी मिळून आतापर्यंत ८० धावा जोडल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

बडतर्फ पोलीस अधिकारी निघाला दरोडेखोर; कारागृहातच शिजवला SBI लुटीचा कट

दिल्लीत 'इंडिया'-भाजप आमनेसामने; रामलीलावर इंडिया आघाडीचा महामोर्चा

महादेव बेटिंगचा किंग अखेर भारतात! CBI ची मोठी कारवाई! आता होणार मोठे खुलासे?

मंत्री पंकजा मुंडे बनल्या मॉडेल! पंकजाताईंचा रॅम्प वॉक पाहिला का?

SCROLL FOR NEXT