mohammed siraj  twitter
क्रीडा

WATCH WTC Final: वातावरण तापलं! गोलंदाजीला सज्ज झालेल्या सिराजला स्मिथने अचानक थांबवलं; पुढे जे झालं.. -VIDEO

Ankush Dhavre

IND VS AUS WTC FINAL LIVE: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सुरू आहे. हा सामना लंडनमधील ओव्हलच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा ठरवला.

स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेडने भारतीय गोलंदाजांना चांगलंच रडवलं. स्मिथ ९५ धावांवर नाबाद परतला होता. तर स्टीव्ह स्मिथ आणि मोहम्मद सिराजने दुसऱ्या दिवसाची सुरुवातच वादाच्या ठिणगीने केली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेडने पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. दोघांनी पहिल्या दिवशी २५१ धावांची भागीदारी केली. ट्रेविस हेडने आपले शतक पूर्ण केले होते. तर स्टीव्ह स्मिथ ९५ धावांवर फलंदाजी करत होता.

स्टीव्ह स्मिथचे शतक..

स्टीव्ह स्मिथ आपलं शतक पूर्ण करणार हे जवळजवळ स्पस्ष्ट होतं. मात्र पहिल्याच षटकात शतक पूर्ण करेल असं वाटलं नव्हतं. दुसऱ्या दिवसातील पहिले षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज गोलंदाजीला आला होता.

या षटकात २ चौकार मारत स्टीव्ह स्मिथने आपले शतक पूर्ण केले. २ चौकार मारल्यानंतर मोहम्मद सिराजचा पारा चढला. त्याने स्टीव्ह स्मिथच्या दिशेने चेंडू फेकून मारल्याचं दिसून आलं आहे. (Latest sports updates)-

तर झाले असे की, मोहम्मद सिराज आपल्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला होता. तो चेंडू टाकण्यासाठी धावत आला, इतक्यात स्टीव्ह स्मिथ सरकला. शेवटच्या क्षणी स्टीव्ह स्मिथ सरकला.

त्यामुळे मोहम्मद सिराजला राग आला. रागात त्याने चेंडू स्टंपच्या दिशेने फेकला. त्यामुळे स्टीव्ह स्मिथला सरकावं लागलं होत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT